शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राणा पळपुटे आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:03 IST

आ. रवि राणा यांनी कल्याणनगर ते यशोदानगर रस्त्याच्या विकासकामाच्या निधीचे पुरावे सादर करणार असल्याचा गाजावाजा केला; पण ठरल्या वेळेत ते आले नाही. रवि राणा हे पळपुटे आमदार आहेत, हे आता सिद्ध झाले आहे, .....

ठळक मुद्देपत्रपरिषद : शांततेचा मार्ग स्वीकारत बेशरमचे रोपटे लावणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आ. रवि राणा यांनी कल्याणनगर ते यशोदानगर रस्त्याच्या विकासकामाच्या निधीचे पुरावे सादर करणार असल्याचा गाजावाजा केला; पण ठरल्या वेळेत ते आले नाही. रवि राणा हे पळपुटे आमदार आहेत, हे आता सिद्ध झाले आहे, असे विधान रविवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत नगरसेवक तुषार भारतीय यांनी केले.आमदार राणांना रविवारी सकाळी ११ वाजता पत्रपरिषदेमध्ये पुरावे सादर करा, असे आव्हान तुषार भारतीय यांंनी दिले होते. त्यांच्याशी चर्चा करायला आपण तयार आहोत. एक तासापासून त्यांची वाट पाहत आहोत. त्यांनी यावे आणि पुरावे असल्यास द्यावेत, असे भारतीय यावेळी म्हणाले. आमदार राणा यांना त्यांनी न केलेल्या कुठल्याही कामाचे श्रेय घेत तसे सांगत फिरण्याची सवयच जडली आहे. अशा पळपुट्या आमदाराचा बुरखा उतरविण्यासाठीच आपण पत्रकारांसमोर आलो. सोमवारी संविधान दिवस आहे. त्याअनुषंगाने दुपारी २ वाजता खोटारडे आमदार राणा यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांसमवेत शांततेच्या मार्गाने जाऊन बेशरमचे रोपटे लावणार आहे. संविधान दिवस असल्याने कायदा हातात न घेता शांततेत सदर उपक्रम पार पाडू, असे तुषार भारतीय यांनी ठणकावून सांगितले.कल्याणनगर ते यशोदानगर मार्गाच्या विकासकामाचा प्रश्न माझ्याकडून तरी सुटला आहे. यानंतर आपण या विषयावर बोलणार नसल्याचेही तुषार भारतीय यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला नगरसेविका सुरेखा लुंगारे, भाजप शहर उपाध्यक्ष मुन्ना सेवक, कौशिक अग्रवाल, संपर्कप्रमुख ओमप्रकाश भुतडा यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती विवेक कलोती यांनी पत्रपरिषद सुरू होेण्यापूर्वी हजेरी लावली. मात्र, पत्रपरिषद होत असताना व्यासपीठावर त्यांची उपस्थिती नव्हती, हे विशेष!नवरा-बायकोची पार्टीआ. राणा हे कुणाचेच नाहीत. काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेससोबत जवळीक साधायची व नंतर त्यांच्याच मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द काढत गावोगावी फिरायचे, असा त्यांचा स्वभाव आहे. आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचे सर्वांना सांगत फिरत आहेत. जेवढा मुख्यमंत्र्यांनी त्यांना निधी दिला, तेवढाच निधी मुख्यमंत्र्यांनी मलाही दिला आहे. आता युवा स्वाभिमानी संघटना ही फक्त नवरा-बायकोची पार्टी उरलेली असल्याचा उल्लेखही तुषार भारतीय यांनी यावेळी केला.उद्या म्हणतील मुख्यमंत्र्यांना आणा..आ. राणा हे पालकमंत्र्यासमवेत चर्चा करायला तयार आहेत. तेव्हा आपण पालकमंत्र्यांना का पत्रपरिषदेला आणत नाही, याबाबत भारतीय यांना पत्रकारांनी छेडले. यावेळी भारतीय म्हणाले, ते राणा आहेत; आता पालकमंत्र्यांना आणा म्हणत आहेत, उद्या म्हणतील - मुख्यमंत्र्यांना चर्चा करण्यासाठी आणा...

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा