शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

अमरावतीत ‘सीएए’च्या समर्थनार्थ रॅली; बाजारपेठ बंद, हजारो नागरिक सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 18:02 IST

रॅलीत १००० फूट लांबीचा तिरंगा युवकांनी आपल्या डोक्यावर उचलून धरला होता.

अमरावती : नागरिकत्व संशोधन कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ शहरात गुरुवारी सकाळी ११ वाजता महारॅली काढण्यात आली. यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. लोकाधिकार मंचाच्यावतीने आयोजित या महारॅलीला दीडशेवर संघटनांचा पाठिंबा लाभला.

‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ नेहरू मैदानातून निघालेली रॅली राजकमल चौक, श्याम चौक, सरोज चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, रेल्वे स्टेशनमार्गे पुन्हा नेहरू मैदानात दाखल झाली. यामध्ये तिरंगा व भगवे झेंडे तसेच या कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यामध्ये समर्थनार्थ गगनभेदी घोषणा देण्यात आल्यात. रॅलीत १००० फूट लांबीचा तिरंगा युवकांनी आपल्या डोक्यावर उचलून धरला होता. या रॅलीच्या निमित्ताने गुरुवारी दुपारपर्यंत बाजारपेठ बंद होती.

या रॅलीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपासून लोकाधिकार मंचाद्वारा नागरिक व सामाजिक संघटनांच्या भेटी घेऊन महारॅलीमागची भूमिका समजावून सांगण्यात आली. सोशल मीडियासह सर्वच मार्गांचा अवलंब करीत महारॅलीचा प्रसार व प्रचार करण्यात आला. या महारॅलीचा समारोप नेहरू मैदानात झाला. याचे रुपांतर जाहीर सभेत झाले. या महारॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष, आरएसएस, भाजयुमो, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह दीडशेवर संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला व पुरुष नागरिक सहभागी झाले.

विरोधकांनी निर्माण केला संभ्रम - हसंराज अहीर कुठल्याच नागरिकांच्या नागरिकत्वावर या कायद्याने परिणाम होणार नाही. मात्र, काँग्रेस व विरोधी पक्षांद्वारा नागरिकांमध्ये कायद्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. किंबहुना देशात सद्यस्थितीत जो उद्रेक होत आहे, त्याला काँग्रेस पक्षच जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केला. यावेळी व्यासपीठावर महापौर चेतन गावंडे, मोहनदादा अमृते, कथाकार रामप्रिया, कल्लुजी सलुजा, राम हरकरे, अनिल साहू, भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रदेश प्रवक्ते, शिवराय कुळकर्णी, बादल कुळकर्णी यांच्यासह माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावतीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक