शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

चिंचोली गवळी येथे सात घरांची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:19 IST

तालुक्यातील खानापूर येथील आगीच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच मंगळवारी चिंचोली गवळी येथे आग लागून सात घरांची राखरांगोळी झाली. यात सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. मोर्शी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचोली गवळी येथे मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास हा अग्निप्रलय झाला.

गॅस सिलिंडर फुटलेमोर्शी : तालुक्यातील खानापूर येथील आगीच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच मंगळवारी चिंचोली गवळी येथे आग लागून सात घरांची राखरांगोळी झाली. यात सुमारे २० लाखांचे नुकसान झाले.मोर्शी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचोली गवळी येथे मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास हा अग्निप्रलय झाला. या आगीत हिरावती अळसपुरे, मंदा नवड, योगीराज पाटील, मदन डांगे, महिपलसिंग बावरी, चंद्रकला पाटील, प्रमोद पाटील यांची घरे जळून खाक झाली. जोरदार हवेमुळे अग्निशमन दलाचे बंब पोहोचण्यापूर्वीच सारे काही खाक झाले.गावात आग लागल्याची माहिती ग्रामस्थ प्रल्हाद पकडे यांनी पोलीस ठाणे व पालिका प्रशासनाने दिली. मोर्शी नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता ग्रामस्थ व अग्निशमन पथकाने व्यक्त केली. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या आगीत कूलर, पंखा, फ्रीज, आलमारी, कपडे, पाण्याच्या टाक्या, धान्य जळून खाक झाले. घराला लागलेले नाटा, छतासह लाकडी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.ग्रामस्थांची तत्परतायोगिराज पाटील यांचे गॅस सिलिंडर फुटल्याने आग भडकली. अशा स्थितीत ज्यांच्या घरी सिलिंडर होते, त्यांनी जिवाची पर्वा न करता ते बाहेर काढले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :fireआग