शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

राजापेठ रेल्वेपुलाचे पुन्हा भूमिपूजन!

By admin | Updated: August 23, 2014 23:41 IST

बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित उड्डाणपुलाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २५ आॅगस्ट रोजी पुन्हा भूमिपूजन होणार आहे. या उड्डाण पुलाचे लोकसभा निवडणुकीपूर्वी

नवा वाद : उपमुख्यमंत्री कार्यालयातून महापालिकेला पत्रअमरावती : बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित उड्डाणपुलाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २५ आॅगस्ट रोजी पुन्हा भूमिपूजन होणार आहे. या उड्डाण पुलाचे लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदारांनी घिसाडघाईत भूमिपूजन केले होते. आता नव्याने भूमिपूजनाचा सोहळा होत असल्याने राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना असा वाद रंगण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.उपमुख्यमंत्री पवार यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत साजणीकर यांनी महापालिका आयुक्तांना २२ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून उपमुख्यमंत्र्यांनी २५ आॅगस्ट रोजी विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी ज्या विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहायचे आहे त्या कामांना प्रशासकीय मान्यता अथवा परवानगी घेण्यात आली किंवा नाही याचा अभिप्राय त्यांनी मागितला आहे. हा अभिप्राय मिळताच उपमुख्यमंत्र्यांचा दौरा पाठविणे सोईचे होईल, असे मंत्रालयातून महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. ज्या विकास कामांना प्रारंभ करावयाचा आहे ती कामे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. परंतु राजापेठ उड्डाणपुलाचे यापूर्वीच भूमिपूजन आटोपल्याने पुन्हा नव्याने भूमिपूजनाचा सोहळा कशाला, असा सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे यांनी उपस्थित केला. हा भूमिपूजन सोहळा म्हणजे विधानसभा निवडणुकीचे गणित होय, असा आरोप वानखडे यांनी केला आहे. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित उड्डाणपुलाच्या निर्मिसाठी खासदारांनी रेल्वे प्रशासनाकडून ११ कोटी रुपये मंजूर केले आहे. (प्रतिनिधी)