शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विभागात 76 टक्क्यांवर स्थिरावला पाऊस, 24 टक्क्यांची तूट : यवतमाळात अल्प पर्जन्यमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:02 IST

१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे.

प्रदीप भाकरेअमरावती : १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे.भारतात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत मान्सून कोसळतो. पावसाच्या या चार महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ७७७.९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. मात्र ३० सप्टेंबरला मान्सून संपुष्टात आल्यानंतर विभागात २४ टक्के कमी पाऊस नोंदविला गेला. अमरावतीमध्ये ८१४.५ मि.मी. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ५४८.१ (६७.३ टक्के), अकोल्यात ६९७.३ मि.मी. च्या तुलनेत ५५० मि.मी. (७८.९ टक्के), यवतमाळच्या ९११.३ मि.मी.च्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ५६२.१ (६१.७ टक्के), बुलडाण्यात ६६७.८ मि.मी.च्या तुलनेत सर्वाधिक ६६४.५ मि.मी. (९९.५ टक्के), तर वाशिम जिल्ह्यात ७९८.७ मि. मी.च्या तुलनेत ३० सप्टेंबरपर्यंत ५८१.३ मि.मी. अर्थात ७२.९ टक्के पाऊस नोंदविला गेला.अकोला आणि बुलडाणा या दोन जिल्ह्याचे प्रत्यक्ष पर्जन्यमान ७६ ते ९९.५ टक्के राहिले, तर उर्वरित अमरावती, यवतमाळ व वाशिममध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला.यवतमाळात ३८.३ टक्के पावसाची तूटविभागाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ३८.३ टक्के, अमरावतीमध्ये ३३ टक्के, अकोल्यात ११ टक्के, बुलडाण्यात ०.५ टक्के, तर वाशिममध्ये २७.१ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली.सर्वात कमी पावसाचे तालुकेअमरावतीमधील धारणीत ५८ टक्के, अकोल्यातील पातूरमध्ये ६४.६, यवतमाळातील कळंब तालुक्यात ३३.५ टक्के, बुलडाण्यातील शेगाव तालुक्यात ७५.८ टक्के आणि वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यात ५२.४ टक्के इतका अल्प पाऊस पडला. पाचही जिल्ह्यातील ५६ तालुक्यांच्या तुलनेत या पाच तालुक्यात पर्जन्यमानाची सर्वाधिक तूट नोंदविली गेली.