शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशात संततधार पावसामुळे पूर्णा धरणाचे सात दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:13 IST

तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देदिलासा : धरणातून १५० घनमीटरने विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात ८६.८१ टक्के जलसाठा गोळा झाल्याने धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले. धरणातून १५० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मध्य प्रदेशात पाण्याचा जोर वाढल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणाच्या पाण्याचा पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणात शनिवारी ९२ टक्के पाणीसाठा गोळा झाल्याने धरणाचे सर्वच ९ दरवाजे उघडन्यात आले होते. मात्र, रात्री १२ वाजता हे दरवाजे पुन्हा बंद करून केवळ तीन दरवाजेच उघडे ठेवण्यात आले. मात्र, सकाळी पाण्याची आवक अधिक वाढल्याने सकाळी धरणाचे सात दरवाजे २५ सेमी उघडण्यात आले आहे. यामधून १५० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत असून, पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून वाहणारे हे पाणी देऊरवाडा, काजळी, ब्राम्हणवाडा थडी, थूगाव पिंप्री, निंभोरा, पिंपळखुटा, तोंगलापूर, कुरळपूर्णा या गावातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांतून ओसंडून वाहत आहे.  तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. चांदूर बाजार तालुक्यात संततधार पाऊस सुरूच आहे.तालुक्यातील विश्रोळी येथील धरणाच्या भागात २६ मिमी पाऊस झाला असल्याचे नोंद झाली आहे तसेच चांदूरबाजार मंडळात २६ मिमी, बेलोरा १८.२० मिमी, तळेगाव मोहना १५.०२ मिमी, आसेगाव पूर्णा १२.२० मिमी, ब्राम्हणवाडा थडी २५ मिमी, शिरजगाव कसबा १२ मिमी, करजगाव ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी १६.७७ मिमी पाऊस झाला असून तालुक्यात एकूण ६७३.१७ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी ४८२.६६ मिमी पाउस झाला होता. पूर्णा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे अद्याप गावांना नुकसान झाले नाही, तर मध्य प्रदेशात डोंगरदºयातून धरणात पाणीसाठा वाढत आहे. धरणातून विसर्ग वाढल्यास नदी-नाल्यातील पाणीपातळी अचानक वाढू शकते. यामुळे नदीकाठी राहणाºया नागरिकांनी नदीमध्ये जाणे टाळावे. पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, असे आवाहन तहसीलदार खोडके यांनी केले.

टॅग्स :Purna Riverपूर्णा नदीDamधरण