शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कापूस भिजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

ठळक मुद्देतुरीचा फुलोर गळाला : संत्राही अडचणीत, शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या अवकाळी पावसाने पुन्हा झाडावरील फुटलेला कापूस भिजला, तर तुरीचा फुलोर गळून पडला आहे. संत्रा उत्पादकही अडचणीत आला आहे.अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा घराच्या टिनावर हा कापूस शेतकऱ्यांनी वाळविला. पण, त्यातली आर्द्रता कमी होऊ शकली नाही. अखेर पडत्या किमतीत शेतकºयाने वजनात कटोती देत कापूस विकला. दरम्यान पाऊस थांबला.शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्यात. परंतु १२ डिसेंबर रोजी रात्री दरम्यान धो-धो पाऊस बरसला. यात शेतातील होता नव्हता तोही कापूस ओला झाला. याच पावसाने तुरीचाही बार गळाल्याने नुकसान झाले. तुरीचा फुलोर गळून पडला. ढगाळ वातावरणाने तुरीवर रोग, अळ्याही वाढल्या आहेत. ९ हजार ३८६ हेक्टरमधील तूर पिकाचे नुकसान झाले आहेआधीच सुलतानी संकटाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने घाला घातला. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. रासायनिक खते व फवाऱ्यांचा वापर करत शेतकºयांनी कपाशीला उभारी दिली. मात्र, काल परवाच्या पावसाने पुन्हा कापसाच्या वाता झाल्या असून, दरही पडले आहेत. आता केवळ रबीतील गहू व हरभरा या दोन पिकांवर लाखो शेतकऱ्यांची मदार आहे.

आंबिया बहरवर परिणामसततच्या पावसात संत्रा उत्पादक शेतकऱ्याला संत्राझाडांना तडन देता आली नाही. दरम्यान पाऊस थांबल्यामुळे संत्राबगीचे आंबिया बहारकरिता शेतकऱ्यांनी तडनवर सोडले. परंतु गुरूवारी पडलेल्या अवकाळी पावसाने परत जमीन भिजली. यात त्या तडनवर परिणाम झाल्यामुळे पुढे फुटणाऱ्या आंबिया बहारावरही त्याचा परिणाम बघायला मिळणार आहे. बगिचे पाहिजे त्या प्रमाणात फुटणार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून गुरूवारचा पाऊस तालुक्यात सर्वदूर झाल्याची नोंद आहे.

टॅग्स :cottonकापूसRainपाऊस