शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

‘पाऊस गाण्यां’वर थिरकली पावले!

By admin | Updated: July 24, 2015 00:10 IST

‘कलर्स’प्रस्तुत ‘झलक दिखला जा’तर्फे मंगळवारी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या कार्यक्रमात ‘लोकमत’ सखीमंच सदस्यांनी धम्माल केली.

अमरावती : ‘कलर्स’प्रस्तुत ‘झलक दिखला जा’तर्फे मंगळवारी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या कार्यक्रमात ‘लोकमत’ सखीमंच सदस्यांनी धम्माल केली. भारतातील सर्वात मोठा सेलिब्रिटी डान्स शो ‘झलक दिखला जा’ दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता कलर्स चॅनलवर सुरू झाला आहे. या सिझनमध्ये नव्या पिढीचे आवडते कलावंत शाहिद कपूर व कल्पक दिग्दर्शक करण जोहर हे परीक्षक म्हणून डान्स गुरू गणेश हेगडे व लॉरेन गॉटलीसोबत काम बघत आहेत. ज्यामध्ये १२ सेलिब्रिटी आपल्या नृत्याचे कौशल्य दाखवीत आहेत. या कार्यक्रमावर आधारित प्रश्नमंजूषादेखील घेण्यात आली. विजेत्यांना कलर्सतर्फे बक्षिसे देण्यात आलीत. कलर्स प्रस्तुत सखीमंचच्या ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या कार्यक्रमात गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुनील वाघमारे, मो. रफींची गाणी सलग १५० तास गाण्याचा विक्रम करणाऱ्या प्राजक्ता मानकर व दीपक मांगलेकर या प्रसिध्द गायकांनी पावसाशी संबंधित तसेच इतरही अनेक सुरेल गाणी सखींसमोर सादर केली. त्यांनी गायिलेल्या गाण्यांमध्ये ‘आज मौसम बडा..., ओ सजना बरखा बहार आयी..., रिमझिम गिरे सावन..., दिवाना हुआ बादल...,ही गुलाबी हवा..., प्रितीचं झुळझुळ पाणी..., गुुलाबी आँखे जो तेरी देखी..., या सदाबहार गाण्यांचा समावेश होता. कोरिओग्राफर नितीन आसुदानी यांच्या स्टार डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आणि सखीमंच सदस्यांनी आकर्षक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. कार्यक्रमात महापौर चरणजितकौर नंदा, ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गणेश देशमुख, स्टार डान्स अकादमीचे नितीन आसुदानी, नगरसेविका अर्चना इंगोले, जयश्री मोरे उपस्थित होत्या. सखींनी धरला फेरपाऊसगाण्यांवर सखीमंच सदस्य महिलांनी उत्साहाने फेर धरला. त्यामुळे अख्खे सभागृह दणाणून गेले होते. अनेक सखींनी लयबध्द नृत्य सादर करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे प्रदर्शन केले. महिलांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेतेकार्यक्रमात आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेत नीलिमा पाटील, रंजना वाघ, राधिका देशमुख, रश्मी अग्रवाल, साक्षी गुल्हाने, माया पांचाळे, कविता बलोंद, निखात खान, मनीषा डाखोरे, रंजना देशमुख या विजयी ठरल्या. त्यांना पुरस्कृत करण्यात आले.