शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

धामणगावात बरसल्या जलधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 5:00 AM

पावसाचा श्रीगणेशा करणाऱ्या रोहिणी नक्षत्राला २४ मे रोजी प्रारंभ झाला. मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहिली जात असतानाच बुधवारी तालुक्यातील बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात रोहिणीचा पाऊस बरसला. विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस कोसळला. या पावसामुळे तापमानात कमालीची घट झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळ : पेरणीपूर्व शेतीकामांची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : निसर्ग चक्रीवादळाने धामणगाव तालुक्यात दोन दिवसांपासून जलधारा बरसत आहेत. दरम्यान, संत्रा बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धामणगाव रेल्वे शहरात व तालुक्यात बुधवारी दुपारी १ वाजतापासून पावसाने हजेरी लावली. हा पाऊस १० ते १५ मिनिटे कोसळला. या पहिल्या पावसाचा आनंदोत्सव कोरोनाच्या काळातही धामणगाववासीयांनी साजरा केला.पावसाचा श्रीगणेशा करणाऱ्या रोहिणी नक्षत्राला २४ मे रोजी प्रारंभ झाला. मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहिली जात असतानाच बुधवारी तालुक्यातील बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात रोहिणीचा पाऊस बरसला. विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस कोसळला. या पावसामुळे तापमानात कमालीची घट झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या पेरणीपूर्व कामांनाही कमालीचा वेग आला आहे.यंदाच्या पावसाळ्यातील मृग नक्षत्राला ७ जूनपासून सुरुवात होत आहे. या मृग नक्षत्राचे वाहन म्हैस आहे. या वाहनावर स्वार होऊन पाऊस धो-धो कोसळतो, असा ग्रामीण भागात समज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदरच पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत.यावर्षी थकबाकीदार शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळाले नाही. परिणामी पेरणीशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार थांबले आहेत. आता शासनाने त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याची घोषणा केली असली तरी पीककर्जाची रक्कम अद्याप सदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांची बियाणे खरेदी थांबली आहे.

टॅग्स :Rainपाऊस