शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

रेल्वेत अवैध खाद्य पदार्थ विक्रे त्यांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:39 IST

भुसावळ ते बडनेरा दरम्यान रेल्वे गाड्या व प्लॅटफॉर्मवर अवैधरीत्या खाद्य पदार्थ, शीतपेय, चहा व कॉफी विक्रीला लगाम बसविला आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे नवनियुक्त प्रबंधक राम किरण यादव यांनी रेल्वेत वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेतली आहे.

ठळक मुद्देभुसावळ ते बडनेरादरम्यान कारवाई : वाढत्या चोरीच्या घटनांची नव्या प्रबंधकांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भुसावळ ते बडनेरा दरम्यान रेल्वे गाड्या व प्लॅटफॉर्मवर अवैधरीत्या खाद्य पदार्थ, शीतपेय, चहा व कॉफी विक्रीला लगाम बसविला आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे नवनियुक्त प्रबंधक राम किरण यादव यांनी रेल्वेत वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेतली आहे. रेल्वे गाड्या किंवा प्लॅटफार्मवर काही गैर आढळल्यास यापुढे रेल्वे सुरक्षा बलाला जबाबदार धरले जाईल, असा फतवा त्यांनी काढला आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर अवैध खाद्य पदार्थ विक्रीस वेंडर्संना गत आठवड्यापासून मनाई करण्यात आल्याची माहिती आहे.धावत्या रेल्वे गाड्यात प्रवाशांचे साहित्य, बॅगची उचलेगिरी आणि मोबाईल चोरी या नियमित घटना आहेत. मात्र, गत पाच वर्षांत रेल्वेत झालेल्या चोरीच्या घटनांपैकी बोटावर मोजण्याइतके आरोपी पकडण्यात आले आहे. मात्र, अकोला येथील खेडकरनगरातील रहिवासी अ‍ॅड. मंजूषा सारंग ढवळे या कुटुंबीयासोबत २४ एप्रिल २०१९ रोजी आनंदवन एक्सप्रेसने (गाडी क्रमांक ०२२१८) हिंगणघाट येथून अकोलाकडे येत असताना सोने, चांदी आणि दोन मोबाईल असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना बडनेरा रेल्वे स्थानकावर निदर्शनास आली. बॅगेत अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल असल्याची तक्रार अ‍ॅड. ढवळे यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदविली. ही घटना धामणगाव ते बडनेरा दरम्यान घडली. याप्रकरणी अवेज खान ऊर्फ लकी युसूफ खान (२५, रा. कारंजा लाड) या आरोपीस अटक केली आहे. मात्र, दिवसाढवळ्या रेल्वे गाड्यांत चोरीच्या घटना कशा आणि कोणामुळे घडतात? याविषयी भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांना त्यांनी निवेदनातून जाब विचारला. त्यानंतर प्रबंधक यादव यांनी रेल्वे सुरक्षा बलाची कानउघाडणी केली. थेट प्रबंधकांनी कानउघाडणी केल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाची दाणादाण झाली. आता यावर ब्रेक लावले आहे.ओळखपत्र, परवाना तपासणी मोहीमरेल्वेत वा प्लॅटफार्मवर खाद्यपदार्थ, चहा, कॉफी, शीतपेय विक्रेत्यांचे ओळखपत्र व परवाने तपासणी युद्धस्तरावर रेल्वे सुरक्षा बलाने चालविले आहे. ज्यांच्याकडे रेल्वे विभागाचा अधिकृत परवाना आहे, तेच वेंडर्स खाद्यपदार्थ विक्री करू शकतील, अशा सूचना आरपीएफने कंत्राटदारांना दिल्यात. बडनेरा, अकोला, मूर्तिजापूर, शेगाव, भुसावळ रेल्वे स्थानकावर ही मोहीम सुरू आहे.रेल्वे गाड्या अथवा प्लॅटफॉर्मवर अनधिकृत हॉकर्सवर निरंतरपणे कारवाई केली जात आहे. याबाबत कंत्राटदारांना अवगत केले आहे. काही गैर आढळल्यास खाद्य पदार्थ विक्रत्यांचे परवाने निलंबित करण्याची आमची तयारी आहे.- के. भाकर, निरीक्षक,रेल्वे सुरक्षा बल, बडनेरा

टॅग्स :railwayरेल्वे