शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

राणांचा विषय गुन्हेगारीचा सीपी म्हणतात, सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:50 IST

वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या विषयात आ. रवि राणा यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी तब्बल ३० मिनिटे बंदद्वार चर्चा केली.

ठळक मुद्देतफावत का? : ३० मिनिटांची बंदद्वार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या विषयात आ. रवि राणा यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी तब्बल ३० मिनिटे बंदद्वार चर्चा केली. मात्र, आ. रवि राणा यांनी सदिच्छा भेट दिल्याचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सांगितले.आ. रवि राणा व पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्यातील संभाषणात तफावत का, असा प्रश्न माध्यमांना पडला होता. पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्हेविषयक मोठ्या घटनांमुळे अमरावतीकर धास्तावले आहेत. जबरी चोरी, घरफोडी, हत्येसारखी गंभीर प्रकरणे शहरात वाढल्याचे पाहून आ. रवि राणा यांनी गुरुवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हेविषयक मुद्द्यांवर चर्चा केली व तात्काळ ठोस उपाययोजना करण्यास सूचविले. गाडगेनगर हद्दीतील हजरत बिलालनगर येथील ताहेरा बानो अदील अहमद या वृद्धेची भरदिवसा हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी त्यांच्या घरातून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. दुसºयाच दिवशी शारदानगरात अ‍ॅड. नारायण टावरी यांच्याकडे ३० लाखांची घरफोडी झाली. शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने आ. रवि राणा उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत नारायण टावरी व ताहेरा बानो यांचे काही नातेवाईकसुद्धा उपस्थित होते. आ. राणा यांनी पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्यासोबत तब्बल ३० मिनिटे बंदद्वार चर्चा केली.राणांची भेट वैयक्तिकआमदार रवि राणा यांनी सदिच्छा भेट दिली. ते वैयक्तिक विषय घेऊन आले होते. चोरी व हत्येच्या प्रकरणाचे धागेदोरे गवसले असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे. आपणदेखील मध्यरात्रीपर्यत पेट्रोलिंगमध्ये सहभागी होत आहोत. गुन्हे घडू नये, यासाठी पोलीस प्रयत्नरत असले तरी गुन्हे घडल्यानंतर गुन्हेगारांना शोधण्याचे आव्हान आमच्यापुढे असल्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहरातील वाहतुकीची कोंडी रस्त्यांच्या बांधकामामुळे होत असल्याचे ते म्हणाले. काळ बदलत असताना गुन्हेगारीचे स्वरूपदेखील बदलत आहे. गुन्हेगारदेखील नव्या पद्धतीने गुन्हे करीत असल्याचे ते म्हणाले.पोलिसांनी चोख कर्तव्य बजावावेचर्चेनंतर आ. रवि राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला असून, गुन्ह्यांवर अंकुश बसावा, यासाठी आपण पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पोलीस आयुक्तांनी हत्या व चोरी प्रकरणात तपासाला गती देण्याचे मान्य केले. दोन्ही प्रकरणांचा लवकरच छडा लावण्याचे आश्वासन दिले. यासाठी पाच पथके गठित करण्यात आली आहेत. दोन उपायुक्तांकडे चोरी व हत्येच्या प्रकरणांचा तपास करीत आहेत. शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असले तरी पोलीसांनी अधिक चोखपणे कर्तव्य बजावावे, असेही आ. राणा यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाPoliceपोलिस