शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलात जेवताना क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये भांडाभांडी; एकाचा गेला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2023 18:41 IST

Amravati News हॉटेलमध्ये जेवण करताना चार मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्याचे पर्यवसान पुढे एकाचा बळी घेण्यात झाले. 

ठळक मुद्देजुना बायपासवरील ढाबा येथील घटनातिघे ताब्यात, जुन्या वैमनस्याची किनार

 

अमरावती: हॉटेलमध्ये जेवण करताना चार मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्याचे पर्यवसान पुढे एकाचा बळी घेण्यात झाले. 

 जुना बायपासवरील एका ढाब्यानजिक रविवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा उर्फ कान्हा ज्ञानेश्वर इसळ (१९, रा. अंबाविहार) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी तिघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. तीनही आरोपींना अटक करून बडनेरा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.             यश संगेले (२२, अंबाविहार), ऋषभ ठाकरे २७, देशपांडे वाडी) व सर्वज्ञ वऱ्हाडे (१९, अंबाविहार) अशी अटक आरोपींची नावे आहेत. खोलापूरी गेट पोलिसांनुसार, कृष्णा उर्फ कान्हा ज्ञानेश्वर इसळ व तिघेही आरोपी रविवारी रात्री बगिया टी प्वाईंटजवळच्या एका ढाब्यावर जेवण करण्यास गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला. वादादरम्यान आरोपींनी कृष्णा उर्फ कान्हाच्या गुडघ्याखाली पायावर चाकूने प्राणांतिक वार केला. तो रक्तबंबाळ स्थितीत ढाब्याच्या प्रवेशद्वारावर कोसळल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. तर, अनोळखी एकाने कान्हाच्या नातेवाईकांना फोन करून त्याचा अपघात झाला असून, त्याला इर्विनमध्ये हलविल्याचे सांगितले. त्यामुळे कान्हाचे नातेवाईक इर्विनमध्ये पोहोचले. मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

कान्हाचे घर खोलापुुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्या पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद घेतली. दुसरीकडे सोमवारी सकाळीच आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह न उचलण्याचा पवित्रा घेतल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. घटनास्थळी एसीपी लक्ष्मण डुंबरे, बडनेराचे ठाणेदार बाबाराव अवचार व खोलापुरी गेटचे ठाणेदार गजानन तामटे यांनी भेट दिली.

तर मृतदेह उचलणार नाहीदरम्यान, कान्हाची स्थिती पाहता तो अपघात नसून त्याचा खून करण्यात आल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी खोलापूरी गेट पोलिसांमध्ये नोंदविली. तर दुसरीकडे नातेवाईकांसह ॲम्बुलन्स चालकांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांची भेट घेऊन फरार आरोपींना अटक होईपर्यंत मूतदेह न उचलण्याचा पवित्रा घेतला. शवागार व इर्विन रूग्णालयात चांगलाच हलकल्लोळ उडाला होता. दुपारी तिनच्या सुमारास तिनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर तणाव निवळला.

ढाब्यावर जेवण करत असताना चौघांमध्ये वाद झाला. त्यात कान्हावर चाकुने वार करण्यात आला. तिनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन केले. तिघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.गजानन तामटे, ठाणेदार, खोलापुरी गेट

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी