शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘पेल्या’तले वादळ शमले; नरवणे कॉन्फिडंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:59 PM

दोन महिन्यांपासून घोंगावत असलेले महापौरपदाचे वादळ अखेर शमले. प्रदेशाध्यक्षांना निवेदन देऊनही पदरी काहीही न पडल्याने ‘बंडोबा’ थंडगार झाले आहेत. पेल्यातले हे वादळ शमल्याने महापौर संजय नरवणे चांगलेच कॉन्फिडंट झाले आहेत. त्यांच्यातील या बदलाची प्रचिती गुरुवारच्या आमसभेतही दिसून आली.

ठळक मुद्देमहापौर बदलाचा विषय : उपमहापौर, सभागृह नेताही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन महिन्यांपासून घोंगावत असलेले महापौरपदाचे वादळ अखेर शमले. प्रदेशाध्यक्षांना निवेदन देऊनही पदरी काहीही न पडल्याने ‘बंडोबा’ थंडगार झाले आहेत. पेल्यातले हे वादळ शमल्याने महापौर संजय नरवणे चांगलेच कॉन्फिडंट झाले आहेत. त्यांच्यातील या बदलाची प्रचिती गुरुवारच्या आमसभेतही दिसून आली.गतवर्षी ठरविल्याप्रमाणे भाजपने महापौरांसह उपमहापौर व सभागृहनेता बदलवावा, अशी मागणी अनेकांनी केली. यात महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांचा अधिक पुढाकार होता. ९ जूनला सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मागणी बंडाळीत बदलली आणि सूर तीव्र होऊ लागला. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या भावनेतून महापौरपदासाठी फिल्डिंग लावण्यात आली. उघड विरोधही करण्यात आला. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरूद मिरविणाऱ्या भाजपने सव्वा वर्षांच्या शब्दाला जागावे, अशी सांघिक प्रतिक्रिया उमटली. शहराध्यक्ष ते राज्याध्यक्षांपर्यंत मागणी रेटून धरण्यात आली. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतरही महापौरांचा चेहरा न बदलल्याने आता विरोधाची धार बोथट होऊन, तलवार म्यान करण्यात आली आहे.महापौर व अन्य पदांसाठी इच्छुक असलेल्यांपैकी बोटावरचे नगरसेवक भाजपचे आहेत. उर्वरित अनेक जणांनी वेळेवर प्रवेश करत भाजपची उमेदवारी पटकावली. त्याचवेळी पाच वर्षे पदे मागायची नाही, असा शब्द त्यांच्याकडून भाजपने घेतल्याचे बोलले जाते. ही काँग्रेस नव्हे, तर भाजप आहे आणि भाजपमध्ये अशी मागून पदे मिळत नसतात, असा साक्षात्कारही अनेक इच्छुकांना झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सव्वा वर्षाचा कालावधी उलटण्यासाठी दोन महिने होऊन जात असताना नरवणे बदलले नाहीत; आता बदलही होणार नाही. त्यामुळेच की काय इच्छुकांनी तलवार म्यान केली. दुसरीकडे नरवणेंना पूर्ण अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याने ते कॉन्फिडंट वाटत आहेत. पहिल्या रांगेतून आलेली चिठ्ठी वाचून न दाखविता गुरुवारच्या आमसभेत नरवणेंनी स्वत:च पीठासीन सभापती म्हणून ‘रुलिंग’ दिले. त्यानंतर नरवणे अन्य जणांच्या सावलीतून बाहेर पडत असल्याची प्रतिक्रिया उमटली.बंडाळी शमली, इच्छा कायमभाजपचे वरिष्ठ नेते महापौर बदलाला राजी आहेत. मात्र, स्थानिक नेते त्याविरोधात असल्याची भावना इच्छुकांमध्ये आहे. त्यामुळेच की काय, भाजपने घेतलेल्या प्रभागनिहाय कंत्राटाचा पुरस्कार न करता झोननिहायची री ओढायची, यासाठी पक्षातील इच्छुकांनी विरोधकांची कुमक मागविली. मात्र, विरोधी पक्षालाही प्रभागनिहाय पद्धती हवी असल्याने भाजपक्षातील विरोध शून्य झाला.