शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१३ लाखांची चोरी करणारा पुतण्या तुरुंगात; इंदूरची वारी; पडली भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 13:52 IST

Amravati News संयुक्त कुटुंब म्हणून एकाच घरात सोबत राहणाऱ्या काकांच्या घरातून तब्बल १३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपी पुतण्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.

ठळक मुद्देबेडरूममध्ये दडविला होता मुद्देमाल

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती: संयुक्त कुटुंब म्हणून एकाच घरात सोबत राहणाऱ्या काकांच्या घरातून तब्बल १३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपी पुतण्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. मोहम्मद वसीम सौदागर असे आरोपीचे नाव आहे. त्याचेकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, मनगटी घड्याळ व १ लाख रुपये वगळता संपूर्ण रोख जप्त करण्यात आली. चोरी केल्यानंतर आरोपीने इंदूरला जाऊन साहित्य खरेदी केले. त्यामुळेच तो पोलिसांच्या रडारवर आला. अन् पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. क्षणार्धात त्याने काकाकडे केलेल्या चोरीची कबुली दिली.

             धारणी पोलिसांनी माजी नगरसेवक असिफ सौदागर यांच्या घरात झालेल्या या जबर चोरीचा छडा लावून घरातील सदस्य असलेल्या भावाच्या मुलाला मुद्देमालासह ३ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली होती. त्याला ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून कोणतीही रक्कम किंवा दागिने जप्त करणे शिल्लक नसल्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नव्हती. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर करून तुरुंगात रवानगी केली. आरोपीकडून दाखल केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

असा झाला पर्दाफाश

दरम्यान, एवढ्या मोठ्या चोरीचा कुठलाच सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा फिर्यादी आसिफ सौदागर यांच्या कौटुंबिक सदस्यांकडे वळविला. चौकशीदरम्यान, आरोपी मोहम्मद वसीम सौदागर हा घटनेनंतर इंदूरला गेला. तेथून त्याने सुमारे १ लाख रुपयांचे हार्डवेअरशी संबंधित साहित्य विकत आणल्याचे उघड झाले. तो धागा पकडून पोलिसांनी त्याची उलटतपासणी घेतली. त्यात तो अलगद अडकला. आता चोरीची कबुली दिल्याशिवाय पर्यायच नाही, हे उमगल्याने त्याने चोरलेला मुद्देमाल कुठे दडवून ठेवला, ते सांगितले. स्वत:च्या बेडरूममधील दिवाणाच्या आत त्याने सोन्याचांदीचे दागिने व रोख एका थैलीत बांधून ठेवली होती.

१७ जानेवारी रोजी घडली होती चोरी

१७ जानेवारी रोजी सकाळी संपुर्ण सौदागर कुटूंब अचलपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. ते १८ जानेवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास धारणी येथे घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. तक्रारीनुसार, ९ लाख ३० हजार ४२० रुपये किमतींचे सोन्याचे दागिने, ७३ हजार २०० रुपयांचे चांदीचे दागिने, तर २ लाख २५ हजार रुपये रोख, मनगटी घड्याळ असा एकूण १२ लाख ३३ हजार ६२० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी १९ जानेवारी रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१३ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपी हा इंदूरला जाऊन खरेदी करून आल्याचा धागा पकडत मोहीम फत्ते करण्यात आली.

- विलास कुळकर्णी, ठाणेदार, धारणी.

 

------------

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी