लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याच्या रागातून एका २२ वर्षीय तरुणीला धमकावून तिचा पाठलाग करणाऱ्या तरुणाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन जानराव इंगळे (वय २८, रा. शिराळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून, सध्या पोलिस त्याचा शोध घेत आहेत. २४ जानेवारी रोजी सायंकाळी यात एफआयआर नोंदविण्यात आला.
तक्रारदार एफआयआरनुसार, तरुणी आणि संशयित आरोपी सचिन यांची गेल्या दोन वर्षापासून ओळख होती. आरोपीने यापूर्वी पीडित तरुणीला लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र, तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यानंतर तिने त्याच्याशी असलेला संपर्कही तोडला होता. याच कारणावरून सचिनने २३ जानेवारी रोजी संध्याकाळी तरुणीच्या येथील घरासमोर जाऊन तिला गाठले. 'तू माझा फोन का उचलत नाहीस? जर तू माझ्याशी लग्न केले नाहीस, तर तुला बघून घेईन आणि तुझे लग्न दुसरीकडे कुठेही होऊ देणार नाही,' अशा शब्दांत त्याने तरुणीला धमकावले.
सततचा पाठलाग आणि तक्रार
धमकी दिल्यानंतरही आरोपीचा त्रास थांबला नाही. तो सतत तरुणीच्या घराच्या परिसरात फेऱ्या मारत होता. अखेर आरोपीच्या जाचाला कंटाळून तरुणीने वडिलांसह फ्रेजरपुरा ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला. तरुणीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी रविवारी, २४ जानेवारी रोजी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सचिन इंगळे विरुद्ध पाठलाग, गुन्हेगारी स्वरूपाच्या धमकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सारिका देशमुख करत आहेत.
Web Summary : A 22-year-old woman was threatened and stalked by a man after she rejected his marriage proposal. Sachin Ingle, 28, has been booked for stalking and criminal intimidation after repeatedly harassing the victim and threatening to prevent her marriage to anyone else. Police are searching for the accused.
Web Summary : एक 22 वर्षीय महिला को एक व्यक्ति ने विवाह प्रस्ताव अस्वीकार करने पर धमकी दी और उसका पीछा किया। सचिन इंगले, 28, को पीड़िता को बार-बार परेशान करने और उसे किसी और से शादी करने से रोकने की धमकी देने के बाद पीछा करने और आपराधिक धमकी देने के आरोप में बुक किया गया है। पुलिस आरोपी की तलाश कर रही है।