शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

अटी-शर्तींची सक्ती, नाफेड केंद्रे ओस, व्यापा-यांची पाच लाख केंद्रांवर सात हजार क्विंटलची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 9:34 PM

अमरावती : जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मागील आठ दिवसांत या केंद्रांवर ३६८  शेतक-यांचे ८ हजार २९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मागील आठ दिवसांत या केंद्रांवर ३६८  शेतक-यांचे ८ हजार २९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. यातुलनेत व्यापा-यांद्वारा यंदाच्या हंगामात हमीपेक्षा कमी भावाने ४ लाख ४५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. शाककीय खरेदी केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तींचा भडीमारासोबतच एफएक्यू निकषाचा फटका शेतक-यांना नाहक बसत आहे. यामुळे नाफेड, पणन व सीसीआयची खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.यंदाचा हंगाम सुरू झाला असतानाही नाफेडची केंदे सुरू झाली नसल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिळेल त्या भावात सोयाबीन बाजार समित्यांमध्ये विकावे लागले. व्यापाºयांनीही आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने सोयाबीनची खरेदी केली. यामध्ये शेतकºयांना कोट्यवधींचा फटका बसला. नाफेडच्या खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांवर सात-बारा, बँक खात्याची झेरॉक्स, अधारकार्ड यासह सोयाबिनची आर्द्रता आदी अटी लादण्यात आल्या आहेत. यंदाच्या हंगामात सोयाबीन सवंगणीच्या काळात अवकाळी पाऊस असल्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सोयाबीनची प्रतवारी खराब झाल्यामुळे डागी सोयाबीन खरेदी केंद्रांवर नाकारल्याने शेतकºयांना खुल्या बाजारात विकावा लागला. व्यापाºयांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांची मनमानी सुरू आहे. यामध्ये सरळ शेतकºयांना फटका बसत आहे.मूग, उडीद, ज्वारीच्या खरेदीवर परिणाम शासकीय धान्य खरेदी सुरू झाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये मुग, उडीद व ज्वारीची आवक होत आहे. शेतकरी शासनाला धान्य न विकता थेट व्यापाºयांशी सौदे करीत असल्याचे चित्र आहे. बाजार समित्यांमध्ये ५१ शेतकºयांनी ५५३ क्विंटल मुग, ६७ शेतकºयांनी ५०७ क्विंटल उडीद विक्री झाला. शेतकºयांनी मोठ्या संख्येत व्यापाºयांकडे मुग व उडीदाची विक्री केली आहे. यंदा कमी पावसामुळे मुग व उडिदाचे उत्पादन प्रभावित झाले आहे. ज्वारी उत्पादक शेतकरी आपला माल थेट व्यापाºयांकडे घेउन जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. शेतकºयांना आॅनलाइन नोंदणीत अडचण नाही. मात्र, यंदाचे बहुतांश सोयाबीन एफएक्यू दर्जाचा असल्यामुळे खरेदी मंदावली आहे. - रमेश पाटील, जिल्हा विपणन अधिकारीनाफेड केंद्रावरील नोंदणी, खरेदी व व्यापारी खरेदी क्विंटलबाजार समिती केंद्र  नोंदणी नाफे ड खरेदी  व्यापारी खरेदी अचलपूर   १६० १५७  १३९०९अमरावती :  २१३ १५  २९८६९६अंजनगाव सुर्जी  ६८ १९८  १३२५३चांदूर बाजार  ६७ ११३ १७१९७चांदूर रेल्वे  ५२३ ३०१  १२८५१दर्यापूर  २२ ३२  १०५८१धामणगाव रेल्वे ५१२  ४७२७  ७०२७३मोर्शी  १२३ ४०८  १९८४३नांदगाव खंडेश्वर  ३०२ ४०२  १४२३७तिवसा  ११२ ६६७   -धारणी  ४९ 000 ५७५०वरूड  ३८ 000 ५२१एकूण  २१९२ ८२९३ ४७७७८५