शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

जनता धोक्यात, अधिकारी संरक्षणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:26 IST

मोर्शी मार्गावर सिमेंट रस्त्याच्या 'हायप्रोफाइल' कामात सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांकडे गंभीररीत्या कानाडोळा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुरक्षेचे उपाय नाही : बांधकामस्थळी रोज शेकडोंचा वावर

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोर्शी मार्गावर सिमेंट रस्त्याच्या 'हायप्रोफाइल' कामात सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांकडे गंभीररीत्या कानाडोळा करण्यात आला आहे. कामावरील कर्मचाºयांच्या जीविताला त्यामुळे जसा धोका उत्पन्न झाला तसाच तो नागरिकांच्याही जीविताला निर्माण झाला आहे. थेट मानवी आयुष्य अडचणीत आणणाºया त्रुटींकडे बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी केलेले दुर्लक्ष चिंताजनक विषय आहे.सार्वजनिक बांधकाम करताना इतर नागरिकांच्या जीविताला बाधा पोहोचू नये, यासाठी संबंधित कंपनीने आणि अधिकाºयांनी काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम सुरू असलेला परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. तो पूर्णत: बंद असणे, त्यातून कुणाचीही जा-ये नसणे ही जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे. बांधकामस्थळी असलेली अवजड यंत्रे, वजनी वस्तूंचा वापर यामुळे अनभिज्ञ व्यक्तीला गंभीर दुखापत होऊ शकते. जेपीई कंस्ट्रक्शन कंपनीला सामान्यांना होऊ शकणाºया या धोक्याशी कुठलीही संवेदना नाही. त्यामुळेच रस्त्याच्या ज्या भागाने बांधकाम काम सुरू आहे, त्या भागात रोज शेकडो वाहनचालकांचा आणि पादचाºयांचा वावर सुरू असतो. नजीकच असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात शहरभरातून चिमुकल्यांना विविध खेळांच्या सरावासाठी घेऊन येणाºया अनेक महिलांना कित्येकदा किरकोळ अपघात या बांधकामस्थळी झाला. प्रवेश निषिद्ध असावा अशा बांधकामस्थळी दिवसभर वाहनांचा वावर असेल, तर बांधकाम खात्याच्या अधिकाºयांची देखरेख सदोष नाही काय? बांधकाम सुरू असलेल्या भागात वावरणारे सामान्यजन दुभाजक ओलांडून पलीकडे भरधाव वाहनांच्या रस्त्यावर प्रवेश करतात.प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेला नोटीसमहापालिका क्षेत्रात होणाºया प्रदूषणाबाबत कारवाईचा अधिकार आम्हाला नाही. तशी सनद आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याअनुषंगाने जनरेटरकरवी प्रदूषण करणाºया संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याबाबत महापालिकेला बजावले आहे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहोळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुरुवारी ती नोटीस महापालिकेला दिल्याचे ते म्हणाले. दरम्यान, अशा प्रकारची कुठलीही नोटीस महापालिकेला गुरुवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाली नसल्याची माहिती पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी दिली. जनरेटरला परवानगी एमपीसीबी देत असेल, तर कारवाई करण्याचा अधिकार कुणाला, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा