शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

सार्वजनिक मंडळांनी घ्यावी प्रसादाची काळजी

By admin | Updated: September 21, 2015 00:05 IST

सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे व त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांना ...

खबरदारी : अन्न, औषधी विभागाची गणेश मंडळांना सूचनाअमरावती : सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे व त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांना अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्या अंतर्गत नियम व नियमन २०११ मधील तरतुदीचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.प्रसाद करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्न पदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा. तसेच प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्ययावत करून ठेवावी. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी. फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळाची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवाना, नोंदणीधारकांकडून करावी. कच्चे, सडलेले किंवा टाकाऊ फळांचा वापर करू नये. प्रसादचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील, याची खात्री करूनच वापरावी. आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी. प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची खात्री करावी, प्रसाद उत्पादन करणाऱ्या स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी (हेड गिअर) इत्यादी देण्यात यावे व प्रत्येकवेळी स्वयंसेवकाने हात स्वच्छ ठेवावेत. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसल्याची खात्री करून घ्यावी. दूध अथवा दूग्धजन्य पदार्थ थंड राहतील, असे कमी तापमानावरच साठवणुकीस ठेवावेत. खवा, माव्याची वाहतूक व साठवणूक थंड, रेफ्रीजरेटेड वाहनांतून करावी व प्रसादामध्ये यांचा वापर होत असल्यास दक्षात घेण्यात यावी. जुना, शिळा अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठविलेला खवा, मावा प्रसादासाठी मुळीच वापरू नये. अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य करावे व त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील. या व्यतिरिक्त अन्न, प्रसाद याबाबत काही संशय असल्यास आपल्या क्षेत्राच्या अन्न सुरक्षा अधिकारी अथवा सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. वरीलसंदर्भात माहिती, तक्रार, सूचना असल्यास एफडीए हेल्पलाईन क्र. १८००२२२३६५ वर कळवावे, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)