शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘त्या’ सायको क्रिमिनल’कडून फ्रेजरपुऱ्यातील गुन्ह्याची कबुली, मुद्देमालही जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: August 21, 2023 18:13 IST

आरोपीची प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळी मोड्स ऑपरेंडी

अमरावती : राजापेठ पोलिसांनी अंबाविहार व गंगोत्री कॉलनीतील जबरी चोरीप्रकरणी अटक केलेल्या मनीष अनिल जोशी या ‘सायको क्रिमिनल’ने फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याला प्रोडक्शन वारंटने फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. त्याचेकडून त्या गुन्ह्यातील १२.५ ग्रॅम सोने देखील हस्तगत करण्यात आले आहे.

गेल्या चार पाच वर्षांपासून शहरात जबरी चोरी करणारा मनीष जोशी (३०, रा. पार्वतीनगर नं.३) हा अद्यापही पोलीस रेकॉर्डवर आला नव्हता. मात्र राजापेठ पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने पीसीआरदरम्यान राजापेठ येथील पाच, फ्रेजरपुरा येथील तीन व खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात नोंद एक अशा एकुण नऊ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात फ्रेजरपुऱ्यातील विना गायकवाड यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात आरोपी जोशीला सोमवारी अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी ही कारवाई केली.

काय होते प्रकरण१५ एप्रिल रोजी उत्तमनगर येथील विना गायकवाड या स्वत:कडील जुने वापरते सोन्याचे दागदागिने एका पिशवीत ठेऊन मोतीनगर परिसरातील सराफा दुकानात गहाण ठेवण्याकरीता गेल्या. दुकान बंद असल्याने त्या घराकडे पायदळ येत असतांना यशोदानगर चौकात दुचाकी स्वाराने त्यांना थांबविले. आपण पापड व्यवसायिक असल्याचे सांगून त्यांना पापड लाटण्याचे कामाकरीता आठ हजार रुपये रूपये महिना देण्याची बतावणी केली. तथा त्यांना स्वत:च्या घरी घेऊन जात असल्याचे सांगत दुचाकीवर बसविले. तथा कलोतीनगर येथे निर्जन स्थळी नेऊन जबरीने त्यांच्या हातातील दागिने असलेली पिशवी हिसकावून तो तेथून पळून गेला. तो भामटा मनीष जोशी असल्याचे आता स्पष्ट झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAmravatiअमरावती