शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील कैद्याचे मृत्यू प्रकरण विधिमंडळात, टोळीयुद्धातून मृत्यू झाल्याचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 21:06 IST

अमरावती : राज्यातील मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांमध्ये कैद्यांचे मृत्यू प्रकरण नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे.

अमरावती : राज्यातील मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांमध्ये कैद्यांचे मृत्यू प्रकरण नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे. आर्णी (जि. यवतमाळ) मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांनी कैद्यांच्या आकस्मिक आणि संशयास्पद मृत्यूबाबत आक्षेप घेतला आहे.अलीकडे राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आ. तोडसाम यांनी लक्ष्यवेधीत स्पष्ट केले आहे. कैद्यांच्या मृत्यूची कारणे, कारागृह प्रशासनाकडून उपाययोजना, मृत्यूबाबत वैद्यकीय अहवाल अशा विविध मुद्द्यांंवर आ. तोडसाम हे सभागृहाचे लक्ष वेधणार आहेत. राज्य शासनाने कारागृहाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेसे मनुष्यबळ, बंदूकधारी रक्षक, मनो-यावर २४ तास पहारेकरी, वरिष्ठ अधिका-यांना सुसज्ज निवासस्थान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.मात्र, अलीकडे कारागृहांमध्ये वाढत असलेल्या टोळीयुद्धातून कैद्यांचा मृत्यू ओढवत असताना, त्यांची नोंद आकस्मिक मृत्यू असे नमूद करण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आक्षेप तोडसाम यांनी घेतला आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात धारणी येथील रामसिंग मंगल कास्देकर या आदिवासी तरुण कैद्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे आ. तोडसाम यांचे म्हणणे आहे. रामसिंग बराकीत मृत्यू होणे हे कारागृह प्रशासनासाठी लाजीरवाणे असल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही नाशिक, नागपूर, येरवडा, मुंबईचे आॅर्थर रोड, गडचिरोली आदी कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.कारागृहात बंद्यांचा संशयास्पद मृत्यू हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. कैद्याचा मृत्यू झाला की, कागदी घोेडे नाचवून फाइल बंद केली जाते. याप्रकरणी ठोस निर्णय घेतला जावा, यासाठी विधिमंडळात लक्षवेधी सादर करण्यात आली आहे.- राजू तोडसाम,आमदार, आर्णी

टॅग्स :jailतुरुंगAmravatiअमरावती