जाहिरातीचा गाजावाजा हमीभाव कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:03 PM2017-11-22T23:03:54+5:302017-11-22T23:04:15+5:30

‘शेतमालास हमीभावाचे संरक्षण’ आदी शासन जाहिरातीचा गाजावाजा सर्वत्र सुरू असताना नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

Promotional advertising on the guarantee paper | जाहिरातीचा गाजावाजा हमीभाव कागदावरच

जाहिरातीचा गाजावाजा हमीभाव कागदावरच

Next
ठळक मुद्देशासनाची पोलखोल : शेतकऱ्यांचा माल केंद्रावरून माघारी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : ‘शेतमालास हमीभावाचे संरक्षण’ आदी शासन जाहिरातीचा गाजावाजा सर्वत्र सुरू असताना नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर दोन महिन्यात २४ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली, याच कालावधीत व्यापाऱ्यांनी सात लाख क्विंटल सोयाबीनची बेभाव खरेदी केली असल्याने शासनाच्या धोरणाची पोलखोल झाली आहे.
जिल्ह्यात नाफेडद्वारा शासन खरेदीचे १२ केंद्र तालुकास्तरावर सुरू करण्यात आले. मात्र या ठिकाणी शासन निकषानुसार असलेल्या अटी व शर्तींनुसारच सोयाबीनची खरेदी करण्यात येते. यामध्ये प्रमुख अट आर्द्रतेची आहे. त्यानुसार १२ टक्के आर्द्रता ग्राह्य धरण्यात येते. हमीभाव म्हणजेच ३ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो. मात्र, यापेक्षा थोडा जरी फरक असल्यास सोयाबीन नाकारले जाते. त्यामुळे शेतकºयांना स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नाही. याठिकाणी मात्र शेतकऱ्यांची नड पाहून अगदी १५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सोयाबीनची खरेदी यंदाच्या हंगामात झाली आहे. नॉन एफएक्यू सोयाबीनच्या बाबतीत ग्रेडेशन कसे करावे तसेच या प्रतवारीच्या सोयाबीनमध्ये दरात तफावत किती असावी, याविषयी कोणतेच शासन धोरण नसल्यामुळेच व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांची हजार ते दीड हजारांच्या फरकाने शेतकऱ्यांची लूट होत आहे. आणि शासनाद्वारा शेतकऱ्यांचा माल आधारभूत किमतीत खरेदी केल्याविषयीचे आश्वासन देत असल्याचे विसंगत चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. यंदाच्या हंगामात कापूस वगळता सर्वच शेतमाल आधारभूत किमतीपेक्षा हजार रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मुगाची १७६ शेतकºयांकडून १ हजार ४४९ क्विंटल, उडीदाची ३०२ शेतकऱ्यांची २ हजार ३१५ क्विंटल, ज्वारीची ३१ शेतकºयांची १ हजार ६९ क्विंटल, मक्याची ४ शेतकऱ्यांकडून १३९ क्विंटल तर कापसाची १ हजार १० क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे. नाफेडची खरेदी मंद गतीने होत असल्यामुळे सद्यस्थिीतीत ७ हजार ५२० शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असतानासुद्धा १ हजार २१९ शेतकºयांचीच मोजणी करण्यात आली आहे.
केंद्रांवर सोयाबीनची शासन खरेदी
यंदाच्या हंगामात १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात शासनाद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू झाली, यामध्ये अचलपूर केंद्रावर १,५१९ क्विंटल, अमरावती ३८३, अंजनगाव सुर्जी १,०५१, चांदूर बाजार ३१४, चांदूर रेल्वे ५०४२, दर्यापूर १४७, धामणगाव रेल्वे ९,५०२,धारणी २३०, मोर्शी १,७७३, नांदगाव खंडेश्वर १,९४२, तिवसा २,४६३, तर वरूड केंद्रावर खरेदी निरंक आहे. अशी एकूण १२१९ शेतकऱ्यांची २४ हजार ३५० क्विंटलची खरेदी मंगळवारपर्यंत करण्यात आली.
स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांची खरेदी
मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ७ लाख ८ हजार ४४० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.यामध्ये अमरावती ४,६४,७०५, नांदगाव खंडेश्वर १९,९४६, चांदूर रेल्वे २१,१३६, धामणगाव रेल्वे ८९,१७६, चांदूर बाजार २४,२०८, तिवसा ६५, मोर्शी २६,४४१, वरूड १७,३३९, दर्यापूर १७,३३९, अंजनगाव सुर्जी १५,७२९, अचलपूर २०,३७९, तर धारणी येथे ८,४६० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.

Web Title: Promotional advertising on the guarantee paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.