अमरावती : जिल्हा अनलॉक झाला असला तरी निर्बंधात पाहिजे त्या प्रमाणात सूट मिळालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाकडून रातराणी बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. दैनंदिन फेऱ्यांची संख्या वाढली असली तरी शिवशाही बस बोटावर मोजण्याइतक्याच रस्त्यावर धावत आहेत. एवढेच नव्हे तर खासगी बसलाही प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना निर्बंधात सूट मिळाल्याने एसटी महामंडळाची प्रवासी बस वाहतूक पूर्ववत होत आहे. एक जूनपासून अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू करण्यात आली. काही शहरांमध्ये फेऱ्या पूर्ववत रस्त्यांवर धावत आहेत. हळूहळू निर्बंध आणखी शिथिल होत असल्याने फेऱ्यांची संख्या वाढविली जात आहे. एसटी प्रवासाला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत मध्यवर्ती बस स्थानकासह अन्य मिळून आठ आगारांतून दररोज २०० बसच्या ५७५ फेऱ्या सुरू आहेत. यात पाच शिवशाही बसचा समावेश असून, यामध्ये नागपूर, यवतमाळ, अकोला, पतरवाडा, वरूड यांसारख्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. शनिवार व रविवारी प्रवाशांचा प्रतिसाद कमी प्रमाणात असतो. उर्वरित दिवशी समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. दररोज जवळपास ६३ हजार किलोमीटर प्रवास होत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. खासगी बसना मात्र अपेक्षित प्रवासी संख्या अद्याप तयार झालेली नाही.
बॉक्स
एसटी आगारात किती फेऱ्या सुरू आहेत? - ५७५
शिवशाही किती? - ४५
वाहक - ८६०
चालक -८००
बॉक्स
नागपूर, यवतमाळ, अकोला, परवाडा मार्गावर गर्दी
एसटी महामंडळाने १ जूनपासून अमरावती मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य आगारांतून बसफेऱ्या सुरू केल्या. नागपूर, यवतमाळ, अकोला, परतवाडा, वरूड मार्गांवर प्रवासी संख्याही वाढली आहे. या मार्गांवर ‘लाल परी’सोबत शिवशाही बस सोडण्यात येत आहे. चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बसची संख्या वाढविण्यात आली आहे.
बॉक्स
अद्याप ट्रॅव्हल्सला गती नाही
कोरोनामुळे एसटी महामंडळासोबत खाजगी बस वाहतूक व्यवसायावर मोठा परिणाम झाला. अद्यापही बहुतांश मालकांनी खासगी बस सेवा बंद ठेवली आहे. प्रवासी नसल्याने बस चालविणे अवघड झाले आहे.
निर्बंध शिथिल झाले असले तरी एसटी बससोबत खासगी बसनाही प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश खासगी बस उभ्या आहेत. प्रवाशांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.
खासगी बसचे तिकीट जास्त असले तरी बहुतांश प्रवासी लांबच्या प्रवासाला या बसला प्राधान्य देतात. शहरातून पुणे, नागपूर, औरंगाबाद, इंदोर या