शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘सैराट’मधील 'प्रिन्सदादा' अमरावतीकर राणीच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 07:00 IST

Amravati News ‘सैराट’मधील हा प्रिन्स अमरावतीकर राणीच्या प्रेमात पडलाय. ते दोघे लवकरच अमरावती मुक्कामी विवाहबद्ध होत आहेत.

अमरावतीः सूरज पवार... ‘सैराट’मधील प्रिन्स. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोफळज येथील कोवळा पोरगा. अल्पवयात हीरो ते खलनायकाचा प्रवास करणाऱ्या सूरजला खरे प्रकाशमय करण्याचे सारे श्रेय तसे नागराज मंजुळेंचे. नागराज यांच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांत स्थान मिळविलेल्या ‘प्रिन्स’ अर्थात सूरजसाठी नागराज म्हणजेच आई-बाबा. ‘पिस्तुल्या’ केल्यावर अर्थात ९-१० वर्षांचा असल्यापासून तो नागराजच्या कुटुंबासोबत राहतोय. अलीकडे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्याने ‘झुंड’मध्ये स्क्रीन शेअर केली आहे. ‘सैराट’मधील हा प्रिन्स अमरावतीकर राणीच्या प्रेमात पडलाय. ते दोघे लवकरच अमरावती मुक्कामी विवाहबद्ध होत आहेत. कालपरवा पहिल्यांदा सासरी आल्यानंतर त्याने ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. लाजऱ्या-बुजऱ्या सूरजने दिलखुलास संवाद साधला.

पाच वर्षांपूर्वी ‘सैराट’ चित्रपट आल्यानंतर आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या, प्रिन्स यांची क्रेझ सर्वांमध्येच पाहायला मिळाली. यात आर्चीच्या भावाची, परश्याचा मेहुणा ‘प्रिन्स’ची भूूमिका साकारली सूरज पवार याने. ‘पिस्तुल्या’मधल्या या हीरोने ‘सैराट’मध्ये खलनायकाच्या भूमिकेतही एक वेगळी छाप पाडली. ‘पिस्तुल्या’मध्ये पारधी समाजातील मुलगा, ‘फँड्री’तील जब्याचा दोस्त आणि ‘सैराट’मधील आर्चीचा भाऊ अन् आता मंजुळेंच्या बच्चन स्टारर ‘झुंड’मधील गेस्ट अपियरन्स. सूरजने वयाच्या १८ व्या वर्षी खलनायक साकारला.

जवळपास ९-१० वर्षांचा असल्यापासून तो नागराज यांच्या कुटुंबासोबत राहतोय. या कुटुंबाने त्याला आपलंसं करून घरातील सदस्य बनवून घेतले आहे. तो स्वत:ही ‘अण्णा माझ्यासाठी सर्व काही’ असल्याची प्रांजळ कबुली देतो. मास्तरांच्या भीतीने शाळा अर्धवट सोडणाऱ्या सूरजने आईच्या मृत्यूनंतर शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरू केलाय. तो नागराज मंजुळेंसोबत पुण्याला राहतोय. शिकल्यानंतरच मला माझा मार्ग निवडणे अधिक सोपे जाईल, हे सांगण्यासही सूरज विसरला नाही. आज पाच वर्षांनंतरही सैराटची जादू प्रेक्षकमनावर कायम आहे हे नक्कीच दिसून येते. मला डेली सोप करायला आवडत नाहीत, चित्रपटच आवडतात आणि तेच करीत राहणार, असे सांगणाऱ्या सूरजचा ‘घर, बंदूक, बिर्याणी’ हा चित्रपट लवकरच येतोय.

-----------------------------------------------------

टॅग्स :marriageलग्नSairat 2 Movieसैराट 2