शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीशी फारकतची बतावणी करत त्याने केला ‘लिव्ह इन’मध्ये बलात्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2023 17:50 IST

Amravati News पहिल्या पत्नीशी फारकत घेतली आहे, त्यामुळे तुझ्याशी लग्न करणारच, असे प्रलोभन देऊन ‘लिव्ह इन पार्टनर’ने आपले दशकभर शारीरिक शोषण केल्याची तक्रार एका ४४ वर्षीय महिलेने दर्यापूर पोलिसांत नोंदविली.

अमरावती : पहिल्या पत्नीशी फारकत घेतली आहे, त्यामुळे तुझ्याशी लग्न करणारच, असे प्रलोभन देऊन ‘लिव्ह इन पार्टनर’ने आपले दशकभर शारीरिक शोषण केल्याची तक्रार एका ४४ वर्षीय महिलेने दर्यापूर पोलिसांत नोंदविली. सन २०१२ ते मे २०२३ दरम्यान ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी ९ मे रोजी रात्री ९च्या सुमारास आरोपी प्रदीप नारायणराव गावंडे (रा. कळाशी) याच्याविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला.

             आरोपीने आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन लग्नाचे आमिष दिले तथा लग्न न करता काढता पाय घेतला, अशी तक्रार त्या महिलेने नोंदविली आहे. पोलीस तक्रारीनुसार, आरोपी प्रदीप गावंडे व पीडिता हे सोबत काम करीत होते. त्यावेळी आरोपीने दहा-अकरा वर्षांपूर्वी तिला प्रेमजाळ्यात ओढले. तू पसंत आहेस, असे म्हणून तिला लग्नाचे आमिषदेखील दिले. त्यामुळे तुम्हाला तर पत्नी आहे, तुम्ही माझ्याशी लग्न कसे कराल, असा प्रश्न महिलेला पडला. त्यावर त्याने आपण पत्नीला केव्हाच फारकत दिली आहे, अशी बतावणी करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यानच्या काळात ते पती-पत्नीप्रमाणे लिव्ह इनमध्येदेखील राहिले. आरोपी वारंवार तिचे शारीरिक शोषण केले. मात्र आता नामानिराळा होण्याचा प्रयत्न करत तो गावातून पळून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने दि. ९ मे रोजी पोलीस ठाणे गाठले. पोलीस सूत्रांनुसार, आरोपीची पहिली पत्नीदेखील घरी त्याच्यासोबतच राहते आणि पीडितादेखील तेथेच राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.

४४ वर्षीय पीडिताच्या तक्रारीवरून ९ मे रोजी रात्री ६५ वर्षीय आरोपीविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पसार झाला असून, त्याचे मोबाइल लोकेशन सोलापूरला मिळाले आहे.

संतोष ताले, ठाणेदार, दर्यापूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग