शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

अंदाज चुकला अन्‌ घात झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते.  घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.  ११ केव्हीची ती विद्युत वाहिनी कॉटन मार्केट फीडरवरून कठोरा गावाकडे जाते. त्यावरील विद्युत खांबांची उंची नऊ मीटर असून जमीन व विद्युत वाहिनीमधील अंतर सुमारे २० फूट आहे. पोलीस पंचनाम्यानुसार ‘त्या’ शिडीची उंची २० फुट ५ इंच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुपारी १२ वाजताची वेळ. कठोरा मार्गावरील पी.आर. एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोरील मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लोखंडी शिडी सरकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘त्या’ चौघांना  अवघ्या काही क्षणात    मृत्यू आपल्याला कवेत घेईल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचा अंदाज चुकला अन्‌ घात झाला. वीज प्रवाहाची तीव्रता इतकी भयावह होती की, त्या धक्क्यामुळे ते चौघेही काळे निळे पडले. त्यांच्या हात व पायाचा अक्षरश: कोळसा झाला. शिडी पकडून असलेले त्यांच्या हाताची त्वचा भाजून निघाली. त्यामुळे त्यांचा संपर्क शिडीशी तुटला आणि ते चौघेही माग कोसळले. काहींनी हा अपघात ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते.  घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.  ११ केव्हीची ती विद्युत वाहिनी कॉटन मार्केट फीडरवरून कठोरा गावाकडे जाते. त्यावरील विद्युत खांबांची उंची नऊ मीटर असून जमीन व विद्युत वाहिनीमधील अंतर सुमारे २० फूट आहे. पोलीस पंचनाम्यानुसार ‘त्या’ शिडीची उंची २० फुट ५ इंच आहे. वाहिनीखालून शिडी अलगद जाईल, असे त्यांना दूरवरून वाटले. मात्र, त्यांचा अंदाज जिवावर बेतला.

घरातील कर्ता गमावल्याने आईचा आक्रोशसंजय दंडनाईक हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी होते. ते भूषण आणि चेतन ही दोन मुले व पत्नीसह येथील आदर्श नेहरूनगरात भाड्याच्या घरात २० वर्षांपासून राहत होते. पोटे एज्युकेशन इंस्टिट्यूटमध्ये शिपाई पदावर कंत्राटी कर्मचारी होते. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने नातवासह सुनेचे कसे होणार, असा टाहो फोडत आक्रोश त्या करीत होत्या. 

टाकळी जहागीर येथील ते दोघे अविवाहितटाकळी जहागीर येथील अक्षय साहेबराव सावरकर, गोकुल वाघ हे अविवाहित होते. संसार फुलण्याआधीच त्यांचा बळी गेल्याने नातेवाइकांचा आक्रोश झाला. त्यांच्या घरात ते कमावते असल्याने आई-वडिलांचा आधार गेल्याचे दु:ख व्यक्त होत आहे.

व्यवस्थापनाकडून कुटुंबांना मदत, नोकरीमृताच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ लाख रुपये  सानुग्रह मदत देण्यात येईल, शिवाय त्या चारही कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती पी.आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे किशोर देशमुख यांच्याकडून देण्यात आली.

चार महिन्याच्या मुलाचे छत्र हरपले शिराळा येथील प्रशांत शेलोरकर यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना चार महिन्याचा मुलगा आहे. कुटुंबाची धुरादेखील प्रशांतच्या खांद्यावर होती. त्यामुळे शेलोरकर कुटुंब कोलमडले आहे.  चारही मृतांच्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

पालकमंत्र्यांचे निर्देशरंगरंगोटीच्या कामादरम्यान शिडी उचलताना वीजतारेच्या स्पर्शाने चौघांचा मृत्यू झाला. याचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत तातडीने चौकशी करून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मोबदला मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे. यादरम्यान त्यांचे प्रतिनिधी अरविंद माळवे यांनी इर्विन रुग्णालयाला भेट दिली.

खासदारांची एन्ट्रीखासदार नवनीत राणा यांनी इर्विनमध्ये शवविच्छेदन कक्षात मृतांच्या नातेवाइकांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नातेवाइकांनी ज्यांच्या संस्थेत ही घटना घडली, ते का येत नाही, ते आल्याशिवाय आम्ही मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. बराच वेळ खा. नवनीत राणा यांनी त्यांच्या नातेवाइकांना धीर देत सांत्वन केले. 

 

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू