शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत प्रवीण देशमुख, माधवराव जाधव विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 19:28 IST

पश्चिम विदर्भात दोन संचालक : राज्यात सर्वाधिक मतांचा देशमुख यांचा विक्रम 

अमरावती : मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीच्या अमरावती विभागातील दोन संचालकपदांसाठी प्रवीण देशमुख व माधवराव जाधव विजयी झाले आहेत. सोमवारी मुंबई स्थित वाशी मार्केट यार्डमध्ये ही मतमोजणी झाली. यामध्ये देशमुख यांनी राज्यात सर्वाधिक ४८७ मते मिळविली, तर जाधव यांना ४३७ मते मिळाली.

अमरावती विभागासाठी एकूण सात उमेदवार रिंगणात होते. सर्व बाजार समित्यांच्या संचालकांना मताधिकार असलेल्या या निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. उर्वरित उमेदवारांमध्ये गोविंदराव मिरगे यांना ३६०, पांडुरंग पाटील यांना ३४१, गजानन चौधरी यांना ४०, दिलीप बेंद्रे यांना २२, तर मारोतराव ढवळे यांना ५ मते मिळाली. या निवडणुकीसाठी शनिवारी ९९ टक्के मतदान झाल्याने चुरस वाढली होती. सहा महसूल विभागांतील १२ संचालक व चार व्यापारी प्रतिनिधी पदांसाठी ही निवडणूक झाली. राज्यात एकूण ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीतही महाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

 

बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमधून माजी संचालक अशोक वाळुंज निवडून आले आहेत. त्यांनी राजेंद्र शेळके यांचा पराभव केला. भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे विजयी झाले असून त्यांनी त्यांनी के. डी. मोरे यांचा पराभव केला. मसाला मार्केटमधून मोठी संचालक किर्ती राणा पराभूत झाले असून तेथे विजय भुत्ता विजयी झाले आहेत. धान्य मार्केटमधून निलेश विरा विजयी झाले आहेत. कामगार मतदार संघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केट मधून संजय पानसरे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोईस्कर आणि काँग्रेसचे  धनंजय वाडकर पुढे आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शनिवारी ९२.५७ टक्के मतदान झालं होतं. एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान झालं. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी हे मतदान घेण्यात आलं. या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीचा प्रयोग आला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापनं पॅनल तयार केलं होतं. तर भाजप नेत्यांनीही काही उमेदवारांना ताकद दिली होती. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सहकार, कृषी क्षेत्रातील अनेकांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. सहा महसूल विभाग व व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण १७ हजार ५१३ मतदार होते. महसूल विभागांमध्ये तब्बल ९८.७२ टक्के मतदान झालं होतं, तर व्यापारी मतदारसंघामध्ये ८७.२१ टक्के मतदान झालं. अमरावतीमध्ये ९९, कोकणामध्ये ९९.६४, पुण्यामध्ये ९९ टक्के मतदान झालं होतं.

टॅग्स :MumbaiमुंबईFarmerशेतकरीElectionनिवडणूक