शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीजपुरवठा राहणार बंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:54 IST

Nagpur : वादळामुळे प्रभावित; वीज यंत्रणा दुरुस्तीला झाली आजपासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वादळामुळे प्रभावित झालेली वीज यंत्रणा तसेच पावसाळा लक्षात घेता देखभाल, दुरुस्तीच्या कामे २९ मे ते ३ जूनपर्यंत केली जाणार आहेत. फीडर निहाय ती कामे करण्यात येणार असल्याने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यत संबधित भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय सराटे यांनी केले आहे.

गुरुवारी ११ केव्ही श्रीकृष्णपेठ फिडरवरील देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या फीडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या श्रीकृष्णपेठ, इर्विन चौक येथील काही भाग, शिवाजी सायन्स कॉलेज, तहसील, देवराव गॅरेज या भागाचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. ३० मे रोजी ११ केव्ही चौधरी चौक फीडरवरील वॉलकट कंपाऊंड, कॉटन मार्केट रोड, एपीएमसी, बच्छराज प्लॉट, चौधरी चौक, सिंधी चौक, राम-लक्ष्मण संकुल या भागाची दुरुस्ती होणार आहे. ३१ मे रोजी ११ केव्ही एच.टी. फीडरवरील डफरीन, सुपर स्पेशालिटी, शासकीय तंत्रनिकेतन, जिल्हा क्रीडालय, सांस्कृतिक भवन परिसरात वीज बंद राहिल. १ जून रोजी ११ केव्ही रेल्वे स्टेशन फीडरवरील कामे करण्यात येणार असल्याने जिल्हा रुग्णालय, खापर्डे बगीचा, समाधाननगर, होली क्रॉस, रेल्वे स्टेशन रोड, बसस्थानक, काझी कंपाऊंड, बसस्टँड रोड या भागाचा वीजपुरवठा बंद राहील. २ जूनला ११ केव्ही एल.आय.सी. फीडर दुरुस्तीमुळे अशोकनगर, एलआयसी ऑफिस, गौतमनगर, रामपुरी कॅम्प, भीमनगर, सिद्धार्थनगर, सिव्हिल लाइन या भागाचा, वीजपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती महावितरणने दिली. 

टॅग्स :electricityवीजAmravatiअमरावती