शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये दाेन दिवसात दाेन पाेलिसांच्या आत्महत्या... पाेलीस दलात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 15:50 IST

दोन दिवसात दोन पोलिसांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या २ दिवसात जिल्ह्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर आल्या असून पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

खल्लार पोलीस ठाण्यात कार्यरत बाळकृष्ण राठोड (वय ५०) या पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यालयाच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेतली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. घटनेचा तपास दर्यापूर पोलीस करत आहेत. काल वलगाव येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच पुन्हा एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन-दोन पोलिसांच्या आत्महत्येच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस खात्यात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काल वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक उपनिरीक्षक विजय किसनराव अडोकार गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी त्यांच्या मुलानी पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपल्या वडिलांनी बदलीसाठी वारंवार विनंती केली. मात्र, वलगावच्या ठाणेदारांनी त्यांना बदलीसाठी नाहक त्रास दिला. बदली न करता त्यांना निलंबनाची धमकी देण्यात आली. तो त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज मृताचा मुलगा केतन अडोकार यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दिला. तर, आज आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळ हादरले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूAmravatiअमरावती