शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पोलिसाची एसटी वाहकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:11 IST

पोलीस शिपायाच्या भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच राजापेठ ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई तातडीने कुटंबीयांसमवेत मोर्शी तालुक्यातील दापुरी येथे निघाले. बसमध्ये बसल्यानंतर तिकीट घेताना मोर्शीच्या आधीचे दापुरी गावाजवळ बस थांबविण्यास वाहकाने नकार दिल्याने संतापलेल्या पोलीस शिपायाने एसटी वाहकाच्या कानशिलात लगाविली.

ठळक मुद्देमध्यवर्ती आगारातील घटना : तासभर चक्काजाम, वाहतुकीची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस शिपायाच्या भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच राजापेठ ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई तातडीने कुटंबीयांसमवेत मोर्शी तालुक्यातील दापुरी येथे निघाले. बसमध्ये बसल्यानंतर तिकीट घेताना मोर्शीच्या आधीचे दापुरी गावाजवळ बस थांबविण्यास वाहकाने नकार दिल्याने संतापलेल्या पोलीस शिपायाने एसटी वाहकाच्या कानशिलात लगाविली. ही घटना रविवारी सकाळी ८.२० वाजता दरम्यान मध्यवर्ती आगारात घडली. घटनेनंतर वाहक चालकांच्या संघटनेने रस्त्यावर एसटी आडवी लावून एक तासभर चक्काजाम आंदोलन केल्याने आगारासमोरील मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.राजापेठ ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विजय नागले (रा.पोलीस मुख्यालय क्वार्टर्स) असे आरोपीचे नाव असून, फिर्यादी प्रवीण मधुकर रामदे (४५, रा. मुदलीयारनगर) असे वाहकाचे नाव आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने सिटी कोतवाली ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहचले. मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करून अटक होईस्तर हटणार नाही, अशी भूमिका वाहक-चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने पोलिसांची तारंबळ उडाली. तसेच बस आडवी केल्याने रेल्वे स्टेशन ते शिवटेकडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.व्ही बचाटे हे घटनास्थळीर पोहचले. वाहकाने तक्रार द्यावी, आम्ही गुन्हा दाखल करतो. मात्र बसेस बंद ठेवून वाहतूक कोंडी करू नये, आंदोलन मागे घ्यावे, अशी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तासभरानंतर वाहतूक सुरळीत झाली. आरोपीविरुद्ध वाहकाच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांनी भांदविच्या कलम ३५३, ३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. मात्र, पोलीस शिपायाला भावाच्या अंतविधीसाठी जायचे असल्याने अटक केली नव्हती.पोलीस शिपायला यामुळे आला संतापभावाचा मृत्यू झाल्याची माहिती शिपाई विजय नागले यांना मिळताच त्यांनी तातडीने कुटुंबासह गावी जाण्यासाठी आगारात धाव घेतली. ते मोर्शी बसमध्ये बसले असता माझा भाऊ मरण पावला आहे. त्यामुळे तिकीट मोर्शीची घ्या, पण आदल्या गावात उतरुन द्या, अशी विनंती त्यांनी वाहकाला केली. पण मध्ये बस थांबणार नाही. आपण उतरुण जावे, असे म्हणून वाहकाने वाद घातला. आधीच चिंतेत असलेल्या विजय यांचा संयम सुटला व रागात त्यांनी वाहकाच्या कानशिलात लगावल्याची माहिती प्रथमदर्शींनी दिली.वाहकाच्या तक्रारीवरून पोलीस कर्मचाºयावर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.- एस. व्ही. बचाटे,वरिष्ठ पोलीस निरीक्षकसहकाºयाला मारहाण झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्या कारणाने पोलिसावर कारवाई करण्याची सर्वांची मागणी होती.- नितीन जयस्वाल,आगार व्यवस्थापक

टॅग्स :state transportएसटी