शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मोफत कुल्फी खाणाऱ्या पोलिसांची होणार चौकशी

By admin | Updated: April 18, 2016 00:04 IST

पंचवटी चौकात रात्री उशिरापर्यंत फूटपाथवर कुल्फी विकणाऱ्या महिलेला हटकून तिच्या जवळील मोफत कुल्फी खाणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

डीसीपींनी घेतली दखल : कुल्फ ी विकणाऱ्या महिलेचे नोंदविले बयाणअमरावती : पंचवटी चौकात रात्री उशिरापर्यंत फूटपाथवर कुल्फी विकणाऱ्या महिलेला हटकून तिच्या जवळील मोफत कुल्फी खाणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. यासंदर्भाची दखल पोलीस उपआयुक्त सोमनाथ घार्गे यांनी घेतली असून शनिवारी त्या कुल्फी विकणाऱ्या महिलेचे बयाण नोंदविण्यात आले आहे. पोटची खळगी भरण्यासाठी गाडगे नगरातील एक महिला आपल्या मुलांसह पचंवटी चौकातील फुटपाथवर थंडी कुल्फ ी विकण्याचा व्यवसाय करते. त्यातून ती आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करते. परंतु पाच दिवसांपूर्वी गस्तीवर असलेल्या मोवाईल व्हॅनमध्ये आलेल्या पोलिसांनी तिला हटकले व हा कुल्फी विकण्याचा व्यवसाय बंद करण्याचे फर्मान सोडले. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी कुल्फ्या मोफत खाल्ल्यात. त्या महिलेच्या मुलाने वाहनातील सर्व पोलिसांना कुल्फ्या नेऊन दिल्या व पैसे न देता ते पोलीस तेथून निघून गेले. हा प्रकार 'लोकमत'ने सहचित्र उघडकीस आणला. ते येथेच थांबले नाहीत, तर भररस्त्यात पोलीस व्हॅन उभी केली व राजोरसपणे कायद्याचे उल्लंघन केले. जर पोलीसच असे कारनामे करीत असतील तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवावी, अशी प्रतिक्रिया अमरावतीकरांची होती. अमरावती शहरात अनेक वेळा छोट्या-मोठ्या व लहान व्यावसायिकांना धाकधपट करून त्यांच्याकडून विनामूल्य साहित्य घेण्याचा प्रकार काही नवीन नाही. परंतु आपण एकीकडे महिला सक्षमीकरणाचे धडे देतात व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते पोलीसच असा प्रकार करीत असतील तर याला काय म्हणावे, अशी भावना व्यक्त होत आहे. १०० रुपयांच्या कुल्फ्या खाणारा तो पोलीस कोण? मला माझ्या कुटुंबीयांसाठी १०० रुपयांच्या कुल्फ्या पाहिजे नाहीतर तुला या ठिकाणी कुल्फ ी विक्रीचा व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी देऊन १०० रुपयांच्या कुल्फ्या घेऊन जाणारा तो अल्पसंख्यक पोलीस कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. या पोलिसांमुळे सदर महिला त्रस्त असून तशी भावना तिने शुक्रवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या पोलिसाचाही शोध घ्यायला हवे, अशी प्रतिक्रिया आहे. कुल्फीसंदर्भातील प्रकरणात 'त्या' महिलेचे बयाण नोंदविण्यात आले आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनाही विचारणा केली जाईल. - सोमनाथ घार्गे, पोलीस उपआयुक्त, अमरावती