लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गर्भवती आजारी पत्नीला सासरवाडीत पोहचवून देण्यासाठी गेलेल्या देवमाळी येथील पोलीस पाटलाला ठाणेदाराने अपमानास्पद वागणूक देत मंगळवारी सकाळी उठाबशा काढायला लावल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठांना करण्यात आली आहे. याबाबत पोलीस पाटील संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. संबंधित ठाणेदाराला निलंबित न केल्यास सर्व पोलीस पाटील राजीनामा देणार असल्याचे यात नमूद केले आहे.निवेदनानुसार, पोलीस पाटील राहुल ठाकरे हे परतवाडा येथून २० किलोमीटर अंतरावरील ब्राह्मणवाडा थडी येथे मंगळवारी सकाळी पत्नीला पोहचवून देण्यासाठी गेले होते. तेथे गस्तीवर असलेले ठाणेदार सचिन परदेशी यांनी थांबविले व कुठे चालले, याबाबत विचारणा केली. पत्नीला माहेरी घेऊन आलो व मी पोलीस पाटील आहे, अशी ओळख ठाकरे यांनी दिली. मात्र, त्यांचे काहीएक न ऐकता ठाणेदारांनी लोकांना माइकमधून उद्घोषणेतून गोळा केले आणि पोलीस पाटलाला बघा कशा उठाबशा काढायला लावत आहे, अशी भाषा वापरीत अपमान करण्यात आला. पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष जीवन काळे, राहुल ठाकरे, मीरा म्हाला, प्रताप काठोळे आदींनी निवेदन दिले.राहुल ठाकरे यांच्याजवळ परवानगी, चेहºयाला मास्क नव्हते. त्यांना केवळ उठाबशा काढायला लावल्या. अपमान केला नाही.- सचिन परदेशी, ठाणेदार, ब्राह्मणवाडा थडीठाणेदारांनी ठाण्यात कारवाई करण्याची विनंती धुडकावली. त्यांच्याविरुद्ध कारवाईचे निवेदन संघटनेच्यावतीने दिले आहे.- राहुल ठाकरे, पोलीस पाटील, देवमाळीयापूर्वीही एक जावई कारवाईच्या जाळ्यातराहुल ठाकरे यांच्याकडे कुठल्याच प्रकारची परवानगी नव्हती. तोंडाला मास्कसुद्धा नव्हते. याबाबत एक तर कारवाई करणे किंवा जागेवर शिक्षा देणे व सोडून देणे करावे लागणार होते. त्यांना हेतुपुरस्सर उठाबशा काढायला लावल्या नाहीत. त्यांच्यापूर्वी एका जावयावरही अशीच कारवाई केल्याचे ठाणेदार सचिन परदेशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
देवमाळीच्या पोलीस पाटलाच्या सासरवाडीत उठाबशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST
निवेदनानुसार, पोलीस पाटील राहुल ठाकरे हे परतवाडा येथून २० किलोमीटर अंतरावरील ब्राह्मणवाडा थडी येथे मंगळवारी सकाळी पत्नीला पोहचवून देण्यासाठी गेले होते. तेथे गस्तीवर असलेले ठाणेदार सचिन परदेशी यांनी थांबविले व कुठे चालले, याबाबत विचारणा केली. पत्नीला माहेरी घेऊन आलो व मी पोलीस पाटील आहे, अशी ओळख ठाकरे यांनी दिली.
देवमाळीच्या पोलीस पाटलाच्या सासरवाडीत उठाबशा
ठळक मुद्देगर्भवती पत्नीला पोहचवून देणे भोवले : ठाणेदाराकडून शिक्षा, निलंबनाची मागणी