शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गोव्यात मृत्यू झालेला 'तो' पोलीस कर्मचारी दर्यापूर ठाण्याचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 17:28 IST

गोव्यातील कळंगुट पुलाजवळील पाण्यात बुडालेल्या पाच जणांपैकी एक मृतक दर्यापूर ठाण्याचा पोलीस कर्मचारी असल्याची माहिती  आहे. पाचपैकी तिघांचे मृतदेह सद्यस्थितीत पोलिसांच्या हाती लागले, तर दोघांचा शोध सुरू आहे. 

अमरावती : गोव्यातील कळंगुट पुलाजवळील पाण्यात बुडालेल्या पाच जणांपैकी एक मृतक दर्यापूर ठाण्याचा पोलीस कर्मचारी असल्याची माहिती  आहे. पाचपैकी तिघांचे मृतदेह सद्यस्थितीत पोलिसांच्या हाती लागले, तर दोघांचा शोध सुरू आहे.      बुडालेले पाच जण अकोला जिल्ह्यातील असून मृतांमध्ये दोन भावांचा समावेश आहे. त्यापैकी मृतक प्रीतेश लंकेश्वर नंदागवळी (३२, पोलीस शिपाई) हे अमरावती ग्रामीणमध्ये कार्यरत होते. त्याच्याच लहान भाऊ चेतन लंकेश्वर नंदागवळी (२७, उमरी, विठ्ठलनगर अकोला) याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रीतेश नंदागवळी सन २००८ मध्ये अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस विभागात शिपाईपदी रुजू झाले होते. २०१० ते २०१५ या कालावधीत येवदा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस परिवहन महामंडळची परीक्षा पास होऊन दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करीत होते. तसेच काही महिन्यांपासून दर्यापूर ठाण्याच्या वाहनावर चालकपदी काम करीत असताना २ जूनपासून रजेवर असताना हा अपघात घडला. प्रितेश यांच्या वडिलांचे २७ आक्टोम्बर २०१६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रितेश यांची पत्नी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे नातेवाईकांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. प्रितेश यांच्या मृत्यूमुळे नंदागवळी कुटुंबीयावर दु:खांचे डोंगर कोसळले असून, गावातही शोककळा पसरली आहे. 

जीवलग मित्र हरवलादर्यापूर पोलीस ठाण्याच्या वाहनावर चालक म्हणून प्रितेश काही महिन्यापासून रुजू झाला, त्याने कर्तव्यावर असताना कधीच कामचुकारपणा केला नाही. तो गोव्यातील समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच मोठा धक्का बसला. त्यामुळे माझा एक जीवलग मित्र हरविला, अशी प्रतिक्रिया दर्यापूरचे ठाणेदार मुुकुंद ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस