- चेतन घोगरे अमरावती - काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.मागील काही दिवसांपासून अमरावती ग्रामीण विभागात राज्यातून बदली करून आलेल्या पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकपदांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यापैकी काहींना अभिनाश कुमार यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्यात ठाणेदारपदाचा कार्यभार मिळाला, तर काही अधिकारी अमरावती ग्रामीण मुख्यालय दैनंदिन कामकाज पाहत होते. पण नवे पोलीस अधीक्षक येताच मुख्यालयी असलेल्या पोलीस निरीक्षकांकडून जिल्ह्यातील चांगल्या मलईचे पोलीस ठाणे मिळावे, यासाठी उत्सुक अधिकारी सरसावले आहेत. म्हणून संबंधित पोलीस खात्यातील वरिष्ठ 'गॉडफादर'कडून लॉबिंग लावण्यात येत असल्याचे चित्र आहे. बदलीच्या यादीत वरुड, दतापूर धामणगाव रेल्वे, कुºहा, धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, माहुली जहागीर व वाहतूक शाखेचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. ठाणेदार बदलीबाबत व इतर चर्चेविषयी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून माहिती घेतली असता कुणीही वरिष्ठ अधिकारी याबाबत स्पष्ट बोली शकले नाही.अतिसंवेदनशील गावांसाठी नवीन ठाणेदार नवखे काही दिवसांवर गणपती, दुर्गा उत्सव हे येत असून, जिल्ह्यातील काही शहरे व गावे अति संवेदनशील या संवेदनशील आहेत. यामध्ये जुन्या ठाणेदारांची बदली होणे हे शक्य नसल्याचेसुद्धा बोलले जात आहे.
ग्रामीण ठाणेदारांना बदलीचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:38 IST