शेंदुरजनाघाट : रवाळा शिवारात सातनूर - उमरी मार्गावर फुसे यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजूराची हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.रवाळा शिवारात सातनूर येथील रामजी जोगी कुमरे (५५) हे १२ मार्च रोजी रमेश फुसे यांच्या शेतात कामाला असतांना सायंकाळी अज्ञान आरोपीने त्यांना ठार मारले. अज्ञात आरोपीने काठीने, दगडाने मारुन हत्या केल्याची घटना १२ मार्च रोजी सायंकाळी घडली होती. सुरुवातीला अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शेंदूरजनाघाट पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. १३ मार्चला आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला न्यालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.हा प्रकार शेतमालकाच्या लक्षात येताच त्यांनी शेंदूरजनाघाट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन तपास केला. यामध्ये आरोपी मोहन बंगीलाल सर्याम ५९ याला अटक करण्यात आली. आरोपीकडून पोलीसांनी काठी, कपडे जप्त केले. याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागिय पोलीस अधीकारी राजा रामासामी करीत आहे.
खुनाच्या आरोपीला पोलीस कोठडी
By admin | Updated: March 18, 2015 00:18 IST