शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’ने वेष बदलून पकडला गांजाचा डिलिव्हरीमॅन; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: June 26, 2023 13:09 IST

आरोपी पुसदचा : अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला ‘क्राईम’चा ट्रॅप

अमरावती : अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २५ जून रोजी ‘खाकी’ने वेष बदलून पुसदमधून अमरावतीत आलेल्या गांजाच्या डिलिव्हरी मॅनला अटक केली. त्याच्याकडून नऊ किलो गांजा, दुचाकी, मोबाईल असा एकुण ३.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर ही कारवाई करण्यात आली.

रविवारी गुन्हे शाखेचे पथक आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करित असताना त्यांना पीडीएमसी परिसरात गांजा विक्रीसाठी एक इसम फिरत असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक नरेशकुमार मुंढे व त्यांच्या पथकाने वेशभुषा बदलविली. कुणी पानटपरीचालक तर कुणी हातगाडीचालक झाला. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळा परिसरात ट्रॅप रचण्यात आला. त्या दरम्यान शेख हफिज शेख कादर (३३, रा. मोमीनपुरा मस्जिद जवळ, पुसद, जि. यवतमाळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून २.७० लाख रुपये किमतीचा गांजा, गांजा वाहतूक करण्यासाठी वापरलेली मोपेड तथा दोन मोबाईल जप्त करण्यात आले. त्याला मुद्देमालासह गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखाप्रमुख अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, अंमलदार राजुआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतिश देशमुख, सुधिर गुडधे, सुरज चव्हाण, निवृती काकड, भुषन पदमणे यांनी ही कारवाई केली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीDrugsअमली पदार्थ