शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

सोने विक्रीत लूट

By admin | Updated: May 24, 2014 23:10 IST

येथील सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव घसरले असले तरी येथे मुंबई बाजाराच्या तुलनेत प्रतितोळा एक हजार रूपये इतक्या अधिक दराने सोने विकून ग्राहकांची लूट केली जात आहे.

तयार दागिन्यात २५ टक्के डाग : मुंबईच्या तुलनेत तोळ्यामागे हजाराचा फरक

गणेश वासनिक - अमरावती

येथील सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव घसरले असले तरी येथे मुंबई बाजाराच्या तुलनेत प्रतितोळा एक हजार रूपये इतक्या अधिक दराने सोने विकून ग्राहकांची लूट केली जात आहे. शनिवारी मुंबई बाजारात सोने प्रतितोळा २७ हजार ४५0 रूपये तर अमरावतीत २८ हजार १५0 रूपये दराने सोने विकले गेले.

भारतीय रिझर्व्ह बँकेने सोने आयातीवरील निर्बंध शिथिल केल्याचा सराफा बाजारावर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याचे समजताच सामान्य ग्राहकांनी गुंतवणुकीसाठी सोने खरेदीला प्राधान्य दिले. मात्र, सराफा बाजारात तोळय़ामागे एक हजार रुपये अधिक मोजून सोने खरेदी करावे लागले, हे विशेष. ज्या ग्राहकांनी तयार दागिने खरेदी केले त्यांना २५ टक्के डागी दागिने घेतल्याशिवाय पर्याय नव्हता.

मुंबई बाजाराच्या तुलनेत सोने सर्वसाधारणपणे प्रतितोळा २00 रूपये अधिक दराने विकले जाते. मात्र, ते चक्क एक हजार रूपये अधिक दराने विकण्याचा घाट येथील सराफा व्यावसायिकांनी रचल्याचे दिसते. ही शुद्ध फसवणूक असल्याचे बोलले जात आहे. पाच दिवसांपूर्वी ३0 हजार रूपये प्रतितोळा विकले गेलेले सोने अचानक २८ हजार रूपयांवर पोहोचल्याने सराफा व्यावसायिकही अंचबित झाले आहेत. खर्‍या अर्थाने सोन्याचे भाव सोमवारी २६ मे रोजी निश्‍चित होतील, अशी माहिती एका सराफा व्यावसायिकाने दिली. हल्ली सोन्याच्या दरात अस्थिरता असल्याने मोठय़ा फेरबदलाचे संकेत आहेत. सराफा बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे काही व्यावसायिकांनी केवळ सोन्याची बुकिंग करून घेतली. ग्राहकांना दागिने किंवा सोने देण्याचे टाळले. पुढील आठवड्यात सोन्याचे दर कमी होण्याची चिन्हे आहेत.

सोने विक्रीतून दरदिवसाला तीन कोटींची उलाढाल !

सोने व्यवसायात मुंबई नंतर अमरावतीत मोठी उलाढाल होत असल्याची माहिती आहे. येथूनच विदर्भ, मध्य प्रदेशात सोने पाठविले जाते. येथील काही सराफा व्यावसायिकांचे मुंबईत कनेक्शन असल्याने बसल्या जागी ते कोट्यवधी रूपयांची उलाढाल या व्यवसायात करीत असल्याचे बोलले जाते. अमरावती येथून दरदिवसाला पाच ते सात किलो सोने विक्रीतून तीन कोटींपर्यत उलाढाल होत असल्याचे सूत्राकडून समजते.