शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सामाजिक वनीकरण विभागाची दुर्दशा; ना निधी, ना मनुष्यबळ

By गणेश वासनिक | Updated: July 7, 2024 01:02 IST

अभिसरण योजनेचा फज्जा, सामाजिक वनीकरणाची ‘आयएफएस’ला ॲलर्जी

अमरावती : राज्याच्या वनविभागात वरिष्ठ आयएफएस अधिकाऱ्यांच्या मनमर्जी कारभारामुळे सामाजिक वनीकरण विभागाची अतिशय दुर्दशा झाली आहे. चांद्यापासून तर बांध्यापर्यंत सामाजिक वनीकरणाला ना पुरेसा निधी, ना मनुष्यबळ अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण येता दारी... ही म्हण आता कागदोपत्रीच ठरतेयं की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.

सामाजिक वनीकरण संचालनालयाची निर्मिती १९८२ मध्ये झाली. मात्र ४ डिसेंबर २०१४ रोजीच्या शासन निर्णयाने सामाजिक वनीकरण संचालनालय हे वेगळे विभाग न राहता वन विभागाची एक शाखा म्हणून कार्यरत आहे. महसूल आयुक्त कार्यालय ठिकाणी वनसंरक्षक सामाजिक वनीकरण यांचे कार्यालय असून वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण म्हणून वनसंरक्षक दर्जाचे भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी वृत स्तरावरील काम पाहतात. वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण वृत्त अधिपत्याखाली जिल्हास्तरावर विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) कार्यरत आहेत. विभागीय वन अधिकारी यांना कामातील साहाय्य आणि विभागातील क्षेत्रीय कामांवर नियंत्रण ठेवण्याकरिता सहायक वन संरक्षक साहाय्य करतात. तालुका स्तरावर सर्वसाधारण एक वनपरिक्षेत्र अधिकारी, दोन वनपाल व एक वनरक्षक कार्यरत आहेत. विविध कारणांमुळे दिवसेंदिवस कमी होणारे वन पाहता सामाजिक वनीकरण विभागाचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे.

सामाजिक वनीकरणाची ‘आयएफएस’ना ॲलर्जीजुन्या काळात सामाजिक वनीकरण शाखेमध्ये जिल्हा स्तरावर भावसे संवर्गातील उपवनसंरक्षक दर्जाचे अधिकारी ‘डीडी’ म्हणजे उपसंचालक म्हणून कार्यरत होते. मात्र सध्या ह्या शाखेत आता भावसे अधिकारी यायला इच्छुक नाहीत, तशी सुविधा त्यांनी संवर्ग पुनर्विलोकनमध्ये करून ठेवली आहे. पण वनमंत्र्यांनी ठरवले तर ते संवर्ग पुनर्विलोकनमध्ये बदल करू शकतात. फक्त विभागीय अधिकाऱ्यांनाच सामाजिक वनीकरण का? हा प्रश्न उभा ठाकला आहे.

अभिसरण योजनेचा फज्जा...नागपूर येथील वनभवनात बसणाऱ्या एका भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला अभिसरण योजनेचे स्वप्न पडले आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संपूर्ण वन विभागाचा विरोध पत्करून चुकीची अतार्किक शासकीय खर्चात कोणत्याही प्रकारची बचत न सुचविणारी तसेच प्रत्यक्ष अमंलबजावणीकरिता किचकट योजना क्षेत्रीय कर्मचाऱ्यावर लादली गेली. सामाजिक वनीकरण शाखेकडे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणताही कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. याचे भानही या अधिकाऱ्याने ठेवलेले नाही, ही खरी वन विभागाची शोकांतिका आहे.

वृक्ष लागवडीचा बोजवारामहाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्यांदाच यावर्षी सर्वात कमी वनीकरण, वृक्ष लागवडीची कामे होत आहेत. यास ‘ते’ वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. आता तर अभिसरण योजनेचे आभासी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत फावड्याने खड्डे खोदून झाडे लावण्यास वारंवार व्हि.सी.द्वारे सांगितले जात आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाल्यावरही किंबहुना जुलै-ऑगस्ट महिन्यातही रोपवनाची पूर्व पावसाळी कामे करण्यास ‘ते’ अधिकारी मौखिकरीत्या बाध्य करीत आहेत. मात्र लिखित स्वरूपात कोणताही आदेश देण्यास ‘ते’ तयार नाहीत.

 

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल