‘नवाब’ची सीआयडी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:31 PM2018-03-21T22:31:42+5:302018-03-21T22:31:42+5:30

नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे.

Please inquire about Nawab's CID | ‘नवाब’ची सीआयडी चौकशी करा

‘नवाब’ची सीआयडी चौकशी करा

Next
ठळक मुद्देसहायक वनसंरक्षकांची मागणी : प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र

आॅनलाईन लोकमत
अमरावती : नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे. जबाबदारी असलेल्या वनाधिकाऱ्यांनीच चौकशीची मागणी केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले असून, याबाबत वरिष्ठ कोणता निर्णय घेतात, याकडे वनविभागाच्या नजरा लागल्या आहेत.
प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांच्याकडे २० मार्च रोजी एसीएफ कविटकर यांनी पत्र दिले. नागपूर येथील नेचर व वन्यजीव संस्थेचे त्यापूर्वी सुजोग चव्हाण यांनी २० फेब्रुवारी रोजी वन्यजीव विभागाकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार, नवाब वाघ हा नोव्हेंबर २०१७ पासून पोहरा जंगलात दिसला नाही. तो कटलाबोडी, बोर क्षेत्रात परतल्याचे कविटकर खोटे बोलत आहेत. नागपूर येथील एका वरिष्ठ वनाधिकाºयाने नवाब हा बोर, कटलाबोडी भागात असल्याचा कोेणताही पुरावा नसल्याचे सांगितले. त्याची वीजप्रवाहाने शिकार करण्यात आली असून, शिकारी हे एसीएफ कविटकर यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे याप्रकरणी कविटकर सारवासारव करीत असल्याचे सुजोग चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले होते.
दरम्यान, तक्रारदाराने नवाबची वीजप्रवाहाने शिकार झाल्याचे आजतागायात का दडवून ठेवले? शिकाऱ्यांची नावे तक्रारदारांकडून घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. तक्रारदारांचे भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन २६ फेब्रुवारीच्या महिनाभरापूर्वी ते आजतागायत कॉल डिटेल्स घ्यावेत. तक्रारदाराने वनविभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीहून संपर्क साधला? याची चौकशी करावी आणि पुरावे आढळल्यास माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे कविटकर यांचे म्हणणे आहे. सुजोग चव्हाण यांच्या तक्रारीत तथ्य न आढळल्यास त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका कविटकर यांनी पत्राद्वारे मांडली आहे. नवाब वाघ गायब झाल्याप्रकरणी व्याघ्र प्रकल्प आणि वनविभाग असे द्वंद पेटले असून, खरेच नवाब गेला कुठे, हे स्पष्ट होईल.
खोट्या तक्रारीमागे बड्या वनाधिकाऱ्याचा हात
नवाब गायब झाल्याप्रकरणी सुजोग चव्हाण यांनी खोटी तक्रार दिली असून, यामागे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय कविटकर यांनी व्यक्त केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कंत्राटी कर्मचारी दास जयदीप यांनी सोशल मीडियावर कुणाच्या इशाऱ्यावरून बातमी अपलोड केली, याचा शोध घेतल्यास वास्तविकता समोर येईल, असे अशोक कविटकर यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

एनजीओ सुजोग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. नवाव स्वगृही परतल्याचा अहवाल यापूर्वीच वरिष्ठांना पाठविला आहे. नवाब वाघाची शिकार झाल्याप्रकरणी तक्रारकर्त्याला ठोस पुरावे मागितले असून, ते अद्यापही मिळालेले नाहीत.
- हेमंत मीणा
उपवनसंरक्षक, अमरावती.

Web Title: Please inquire about Nawab's CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.