शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कपाशीला एकरी ५० हजार मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:08 IST

हजारो हेक्टरवरील कपाशी पीक ऐन हंगामात बोंड अळीमुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास बोंडअळीने हिरावून घेतला.

ठळक मुद्देकाँग्रेसची राज्य शासनाकडे मागणी : बोंडअळीने पीक उद्ध्वस्त, शेतकरी आक्रमक

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : हजारो हेक्टरवरील कपाशी पीक ऐन हंगामात बोंड अळीमुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास बोंडअळीने हिरावून घेतला. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेसने तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली.काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदार शिल्पा बोबडे यांना सादर केले. यावेळी निवेदन सादर करणाऱ्यांनी तहसीलदारांच्या पुढ्यात प्रत्यक्ष कपाशीचे झाड ठेवून, त्या झाडावरील बोंडामध्ये असलेल्या शेंदरी अळीच्या प्रकोपाचे प्रात्याक्षिक दाखविले.निवेदन सादर करताना बाजार समितीचे उपसभापती अरविंद लंगोटे, समीर देशमुख, देशमुख, गणेश आठवले, राजेंद्र घुलक्षे, खरेदी-विक्री अध्यक्ष शिवाजी बंड, किशोर देशमुख, किशोर किटकुले, नंदू किटुकले, प्रशांत लंगोटे, नंदू भोयर, अमर चौधरी, नरेंद्र दाभणे, प्रशांत भुस्कटे, फारूक शेख, निसारभाई, प्रवीण वाघमारे, विजय राऊत, सुरेश नागापुरे, अवधूत मातकर, विनायक यावलकर, नरेंद्र दाभणे उपस्थित होते.काँग्रेसच्या दहा मागण्याकाँग्रेसने एकूण १० मागण्या केल्या आहेत. यात शेतकºयांना त्वरित सरसकट कर्जमाफी, कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव, सोयाबीनला सहा हजार प्रतिक्विंटल भाव, नाफेडच्या खरेदीतील सर्व अटी रद्द करून सरसकट सोयाबीन खरेदी, कृषिपंपाचे बिल पूर्णत: माफ, तालुक्यातील अपूर्ण असलेले सर्वच सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करा, शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान रोजहमीद्वारे मजूर पुरविण्यात येऊन त्यांची मजुरी शासनाने अदा करावी, भूमिहीन शेतमजुरांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन व अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ त्वरित रद्द करा आदी मागण्यांचा समावेश आहे.कपाशीवर झालेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बोंड अळीने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याचे चित्र आहे. कमी पावसामुळे सोयाबीनचे फारसे उत्पादन झाले नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नागर फिरवून कपाशी मोडली. शेतकऱ्यांना शासनाने एकरी आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी सामान्य जनांसोबत राजकीय पक्षही पुढे सरसावले आहेत.