चांदूर रेल्वे : सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जवाटप, ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना दोन हजार रुपये पेंशन तसेच नाफेडची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी जनता दल (सेक्युलर) च्यावतीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. बंद केलेली हरभरा व तुरीची खरेदी पूर्ववत सुरू करावी व नाफेडने शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे तातडीने द्यावे, अशी मागणी जनता दलाच्यावतीने एसडीओंंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी गौरव सव्वालाखे, महमूद हुसेन, धर्मराज वरघट, दादाराव डोंगरे, साहेबराव शेळके, संजय डगवार, सुधीर सव्वालाखे, उत्तमराव पडोळे, अंबादास हरणे, अवधूत सोनवने, छाया झाडे, सुनीता भगत, रमेश गुल्हाने, शंकरराव आंबटकर, प्रकाश बन्सोड, अशोक हांडे, प्रमोद बिजवे, अशोक रोडगे, नंदू घोडेस्वार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 21:52 IST
सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जवाटप, ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना दोन हजार रुपये पेंशन तसेच नाफेडची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी जनता दल (सेक्युलर) च्यावतीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
ठळक मुद्देजनता दलाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : नाफेडची खरेदी पूर्ववत सुरू करा