शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील एसटी प्रवाशांसाठी सुखद धक्का; १५ कोटींच्या ‘हायटेक’ मार्ग निवाऱ्यांना मंजुरी

By गणेश वासनिक | Updated: April 4, 2026 18:58 IST

Amravati : अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळमधील एसटी स्थानकांचा कायापालट होणार; अद्ययावत सुविधा मिळणार

अमरावती : रस्त्यावरील ‘लालपरी’च्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या चारही विभागांमधील महत्त्वाच्या थांब्यांवर अद्ययावत ‘प्रवासी निवासी मार्ग निवारे’ बांधण्यासाठी राज्य सरकारने १५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ऊन, वारा आणि पावसापासून प्रवाशांचे संरक्षण होण्यासोबतच त्यांना आधुनिक सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.

शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार, हे मार्ग निवारे केवळ थांबे नसून ते एका ‘मिनी बस स्थानका’प्रमाणे विकसित केले जातील. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या विभागांमधील मुख्य मार्ग आणि ग्रामीण भागातील वर्दळीच्या ठिकाणी हे निवारे उभारले जातील. आधुनिक वास्तुकला आणि मजबूत लोखंडी किंवा काँक्रीटच्या रचनेचा वापर करून हे निवारे आकर्षक बनविले जातील.

प्रवाशांना मिळणाऱ्या ‘स्मार्ट’ सुविधा 

- बैठक व्यवस्था : प्रवाशांसाठी आरामदायी आणि पुरेशी आसनव्यवस्था.- स्वच्छता गृहे : महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ प्रसाधनगृहांची सोय.- पिण्याचे पाणी : शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था.- माहिती फलक : बसच्या वेळापत्रकासाठी डिजिटल किंवा अद्ययावत माहिती फलक.- सुरक्षा : रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना.- हिरकणी कक्ष : स्तनपान करणाऱ्या मातांसाठी स्वतंत्र ‘हिरकणी कक्षाची’ तरतूद काही महत्त्वाच्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे.

विभागीय वाटप आणि अंमलबजावणी

शासनाने एकूण १५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली असून, याचे वाटप चारही विभागांच्या निकडीनुसार केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महामंडळाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामार्फत या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. एमएसआरटीसीच्या अधिकृत निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati ST Travelers to Benefit from Approved Hi-Tech Shelters

Web Summary : Amravati division's ST bus travelers will benefit as the government approved ₹15 crore for modern bus shelters. These shelters will provide amenities like seating, clean restrooms, drinking water, information displays, and enhanced security, improving passenger comfort and convenience across four districts.
टॅग्स :Amravatiअमरावती