शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

अचलपूर-परतवाड्यात नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले.

ठळक मुद्देअमृत योजनेत घोळ; पाणीपुरवठ्यावर खर्ची घातलेले शंभर कोटींहून अधिक ठरले व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रात पाण्याच्या नियोजनासह वितरण व्यवस्था कोलमडली आहे. त्यात अमृत योजनेतील घोळाने अधिक भर पडली आहे. शहरवासीयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. पाणी असूनही नागरिकांना मिळत नसल्यामुळे दहा वर्षांत पाणीपुरवठा योजनेच्या नावे खर्ची पडलेली शंभर कोटींहून अधिकची रक्कम व्यर्थ ठरली आहे.केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले. तेथून २२ किलोमीटर लांबीची शुद्ध पाण्याची गुरुत्ववाहिनी (पाइप लाइन) टाकली गेली. शहरात नव्याने पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. या टाक्यांवरून ९१.४ किमी लांबीची नवीन वितरण व्यवस्था अंथरली गेली. २५ किमी लांबीची जुनी पाइप लाइन बदलविली गेली. पण, नागरिकांना अपेक्षेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यास योजना सक्षम ठरली नाही.दरम्यान, दहा वर्षांच्या आतच नवीन पाइप लाइन टाकली गेली. शहराच्या अनुषंगाने कार्यालयात उपलब्ध रेखाटने आणि प्रत्यक्ष पाइप लाइन याचा कुठे मेळच बसत नाही. या पाइप लाइनचे जॉइंट जोडले गेले नाहीत. काही भागात दुहेरी पाइप लाइन आली आहे. दोन्ही पाइपवर नळ कनेक्शन दिले गेले. मात्र, मीटर बसविले गेले नाहीत.अमृत योजनेतील पाइप लाइनवर मोठे लीकेज आहेत. शहरात रस्त्याच्या एका बाजूला पाणी, तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी ओरड असल्याची स्थिती शहरात दिसत आहे.२० कोटी थकीतअचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नळधारकांकडे पिण्याच्या पाण्याचे २० कोटी थकीत आहेत. यात साडेपंधरा कोटी अचलपूर शहरातील, तर साडेचार कोटी परतवाडा शहरातील नळधारकांकडे थकबाकी आहे. व्याजानुसार ही रक्कम दरवर्षी वाढत असून, थकीतदारांचा पाणीपुरवठा आजही सुरू आहे.नळधारकांकडे २० कोटी थकीत आहेत. व्याजमाफीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. अमृत योजनेतील पाइप जोडले गेलेली नाहीत.- मिलिंद वानखडेअभियंता, पाणी पुरवठा न.प. अचलपूरचौकशीची मागणीअमृत योजनेतील पाइप लाइनची चौकशी करण्याची मागणी काही नगरसेवकांसह नागरिकांनी केली आहे. संबंधित ठेकेदार काम सोडून गेल्याची महिती आहे. काम अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची लगबग सध्या सुरू आहे. चंद्रभागा धरणावरील पाणीपुरवठा योजनेचे आॅटोमायझेशन प्रस्तावित होते. ते दहा वर्षांपासून झालेले नाही.

टॅग्स :Socialसामाजिक