शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

कौंडण्यपूर येथून पिस्टल, तलवारी, रॉड जप्त; सात आरोपींना अटक

By प्रदीप भाकरे | Updated: June 12, 2025 18:16 IST

Amravati : कुऱ्हा पोलिसांची कारवाई

प्रदीप भाकरे अमरावती : दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने एका शिवारात दडलेल्यासात आरोपींना कुऱ्हा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, मॅक्झिन, दोन जीवंत काडतूस, दोन तलवारी, लोखंडी रॉड, काठी, दोन दांडके, चारचाकी व दुचाकी असा एकूण २ लाख ८६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ११ जून रोजी मध्यरात्रीनंतर कौंडण्यपूर येथील अंजनसिंगी टी-पॉइंटलगतच्या एका शेतात ही जंबो कारवाई करण्यात आली.             

अटक आरोपींमध्ये शेख शानू शेख जब्बार (३५, रा. इतरवारा बाजार, वर्धा), अनिल सुरेश परियाल (४२, रा. महादेवपुरा, वर्धा), शेख शाहरूख शेख रऊफ (३०, रा. महाराणा प्रताप वॉर्ड, आर्वी), मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन (३०, रा. गोरक्षण वॉर्ड, आर्वी), आदित्या किशोर डाकोडे (२०, रा. देऊरवाडा, वर्धा), शेख साबीर शेख कदीर (३५, रा. जनता नगर, आर्वी) व प्रतिक बाबाराव ठाकरे (३२, रा. रेल्वे स्टेशन, वर्धा) यांचा समावेश आहे. कौंडण्यपूर येथील अंजनसिंगी टी-पॉइंटलगत असलेल्या एका शेतात काही जण पिस्टलसह घातक शस्त्रे बाळगून असल्याची माहिती बुधवारी रात्री कुऱ्हा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या शेतात धाड टाकली. पोलिसांनी सातही आरोपींना जागीच पकडून त्यांची चौकशी केली. पोलिसांनी त्या शेतातील टिनाची खोली व खोलीमागील शेताची पाहणी केली. त्यावेळी तेथे दोन तलवारी मिळून आल्या.

कारची डिक्कीत पिस्टलखोलीसमोर असलेल्या कारच्या डिक्कीत एका कापडी पिशवीत देशी बनावटीचे पिस्टल, मॅक्झिन, दोन जीवंत काडतूस आढळून आले. तर, रस्त्यालगतच्या दुचाकीच्या साइड गार्डला लोखंडी रॉड, काठी व दोन लाकडी दांडकेही आढळून आलेत. पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई कुऱ्ह्याचे ठाणेदार अनुप वाकडे, पोलीस उपनिरीक्षक विलास थुल, सोमेश्वर सपाटे, योगेंद्र लाड, अनिल निंघोट, उमेश वाघमारे, ज्ञानेश्वर देवतळे, सागर निमकर, दर्पण बनसोड, अक्षय विरघट, कुणाल भोयर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती