शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या पाठीवर पाइपचे वळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:12 IST

मामाचा प्रताप : चाइल्ड लाइनला अपर पोलीस अधीक्षकांकडून मिळाली माहिती

अमरावती : आई-वडील तीन वर्षांपूर्वी दगावल्यानंतर आश्रयाला असलेल्या मुलाच्या पाठीवर मामाने लोखंडी पाइपचे वळ काढले. पोलिसाच्या घरातील या अत्याचाराला खुद्द अपर पोलीस आयुक्त श्याम घुगे यांनी वाचा फोडली. त्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांच्या मदतीने चाइल्ड लाइनने मुलाचा ताबा मिळविला. 

सदर १४ वर्षीय मुलगा गुरुकुंजात शिक्षणासाठी दाखल करण्यात आला आहे. तो महिनाभरापूर्वी अमरावतीत एका नातेवाईक महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी राहायला आला. या पीएसआयची अकोला येथे ड्युटी आहे.  त्यामुळे या घरात त्या मुलाची आजी आणि दोन मामा राहतात. या मुलाला २४ मे रोजी १२.३० च्या सुमारास धामणगावातील मामाने लोखंडी पाइपने मारहाण केल्याची माहिती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्ड लाइनला अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्यामार्फत प्राप्त झाली. त्यांच्या सूचनेवरून चाइल्ड लाइनची चमू घटनास्थळी पोहोचली तेव्हा मुलाची आजी व मामा घरात होते. बराच वेळानंतर त्यांनी दार उघडले. मुलगा एसपी ऑफिससमोर लिंबू-सरबतच्या गाडीवर गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, अर्धा तासाने तो मुलगा घाबरलेल्या स्थितीत बाथरूममधून डोकावत होता. तो केव्हा आला, याबाबत मामा उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून गेला; मात्र आजी ढवळाढवळ करीत होती. त्यामुळे चाइल्ड लाइनने मुलाला बाहेर बोलावले. त्याने पाइपचे वळ दाखवले. यावेळी आजी त्याला परत घरात घेऊन गेली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून चाइल्ड लाइनने दोन सदस्य घरापुढे ठेवून फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. समन्वयक फाल्गुन पालकर यांनी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमेलेंना माहिती दिली. त्यांनी पोलीस व्हॅन पाठवून मुलाला आणले तसेच मामाची चौकशी केली.  चाइल्ड लाइनशी संपर्क साधाअशाप्रकारचे कोणतेही लहान मुला-मुलींच्या छळाच्या घटना कुठेही दिसल्यास, तर चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क करावा, असे आवाहन संचालक सूर्यकांत पाटील, सहायक संचालक प्रशांत घुलक्षे, केंद्र समन्वयक फाल्गुन पालकर, अजय देशमुख, शंकर वाघमारे, अमित कपूर यांनी केले आहे. सदर मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बाल कल्याण समितीच्या परवानगीने त्याला शासकीय बालगृहात पाठविण्यात येईल. मुलाचे समुपदेश केले जाईल - फाल्गुन पालकर, केंद्र समन्वयक चाइल्ड लाइनकडून माहिती मिळाली. प्राथमिक चौकशी करा, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणात मुलाची वैद्यकीय तपासणी करू. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल - आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी