शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

सोशल मिडियावरची गुलाबी मैत्री? जरा जपूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:33 AM

इंटरनेट व स्मार्ट फोनच्या युगाचा फायदा गुन्हेगारी विश्वातील लोक घेत असून आपणाला बेमालूम फसविले जाते. यामध्ये विदेशी महिलांचा वापर अधिक असल्याचा घडलेल्या घटनांवरून दिसून येते.

ठळक मुद्देसर्वसाधारणपासून ते शारीरिक जवळिकीपर्यंतची चर्चा बक्षिस मिळाल्याचे सांगूनही गंडविल्याचे अनेक प्रकार उघडकीस

श्रीकृष्ण मालपे।आॅनलाईन लोकमतअमरावती : इंटरनेट व स्मार्ट फोनच्या युगात फेसबूक, ई-मेल, व्हॉट्स अ‍ॅपवरून संदेशाची देवाण-घेवाण, चॅटिंग आदींमुळे नवीन ओळखी निर्माण होऊन नवनवीन मित्र होत आहे. या ओळखी देशातच नव्हे, तर जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील व्यक्तींशी जवळीक निर्माण करीत आहे. याचाच फायदा गुन्हेगारी विश्वातील लोक घेत असून आपणाला बेमालूम फसविले जाते. यामध्ये विदेशी महिलांचा वापर अधिक असल्याचा घडलेल्या घटनांवरून दिसून येते.फसवणूक कशी होते(घटना क्र. १ - प्रेमिकाची)अमेरिका येथील कंसास शहर. मारी रोजस या ४० वर्षीय महिलेने अमरावती येथील दादाराव (काल्पनिक नाव) यांना फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली. दादाराव यांनी मान्य केल्यावर तिने आपला परिचय हृदयरोगतज्ज्ञ असा दिला. आपण दोन मुलांची विधवा आई आहोत, असे तिने सांगितले. त्यानंतर दादाराव यांनासुद्धा त्यांचे नाव, गाव, पत्ता विचारला. मग रोजच त्या दोघांत मैत्रीपूर्ण मॅसेजचे आदान-प्रदान सुरू झाले. एक ते दीड महिन्यात मारीने त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात घडविले. दादारावच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले असल्याचे सांगितले. तिने मोबाइल नंबर देऊन दादारावला माय डियर, माय डॉर्लींग, माय हनी व शेवटी माय हसबंड यासारखी संबोधने सुरू केली. मॅसेजमध्येसुद्धा ‘माय डियर मला मिठीत घ्याल काय?’ किंवा ‘माय हनी मला किस करा ना’ असे सांगू लागली. त्यामुळे दादाराव हुरळून गेला. दादाराव जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यावर मारीनेही भेटण्याकरिता आपण खूपच आतुर झाल्याचे सांगितले. त्याकरिता तिने भारतात येण्याची तयारीही दर्शविली. सोबत भरपूर पैसे घेऊन येत असून, दादारावच्या शहरात घर व एक कार घेण्याची इच्छाही व्यक्त केली. तसेच दादारावलाही काही रक्कम बक्षीस देणार असल्याचे सांगितले. मारी हिने विमानाच्या तिकिटाचा फोटोही व्हॉट्स अ‍ॅप केला. ठरलेल्या तारखेला ती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्याचा मॅसेज दादारावला धडकला. काही वेळातच आपला पासपोर्ट एअरपोर्ट कस्टम अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव जप्त केला असून, त्याकरिता ३५ हजार रुपयांची मागणी केली. सदर रक्कम भेटीअंती परत करू, असा ग्वाही देणारा कॉल धडकला. यावेळी विमानतळावरील कुण्या महिला कर्मचाऱ्यांशी दादारावचे बोलणे करून दिले. रक्कम जमा करण्यासाठी अज्ञात व्यक्तीचा स्टेट बँक आॅफ पतियाळा या बँकेचा खाते क्रमांक दिला. रकमेच्या मागणीकरिता मारी हिने दादाराव यांच्याकडे वारंवार कळकळीच्या विनंती करून मदत करण्याचे आवाहन केले. (तात्पर्य, इमोशनल ब्लॅकमेल केले) हा घटनाक्रम इथेच संपतो. कारण एकदा खात्यात पैशांचा भरणा झाला की, लगेचच पुढची जीवलग झालेली व्यक्ती फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, मोबाइल सर्व काही बंद करून आपल्याशी असलेला संपर्क तोडते. तेव्हा आपल्याला कळते की, आपण फसविले गेले आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया