लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथील पिंगळाई नदीवर ३ कोटी ५० लक्ष रुपये खर्चाचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाºयामुळे भूगर्भातील जलपातळीत वाढ होण्यासोबतच पुराचा धोकासुद्धा आता राहणार नाही, असा दावा आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सततच्या पाठपुराव्यामुळेच सध्या या बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्या म्हणाल्या.पिंगळाई नदीपात्राचे यापूर्वीच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करून खोलीकरण झाले. त्यानंतर शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये, तसेच भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पूर्वीचा बंधारा काढून टाकण्यात यावा आणि त्याऐवजी ३.५० कोटी खर्चाचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी सातत्याने केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन वित्त नियोजन विभागाने नवी दिल्ली येथील व्यापकॉज या संस्थेने बंधारा स्थळाचे संरक्षण करून या कंपनीने बंधाऱ्याच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. सहा महिन्यांत हे काम आता पूर्ण होणार असल्यामुळे तिवसा शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासोबतच नदीपात्रसुद्धा स्वच्छ राहणार आहे.अप्पर वर्धाचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्नउन्हाळ्यात जलस्रोत आढळल्यामुळे तिवसा शहराला पाणीटंचाई भेडसावते. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या नलदमयंती जलाशयातून तिवसा शहराला पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. अप्पर वर्धा धरणातील पाण्यावर शेतकऱ्यांचा हक्क आहे. नागरिक व गुरांना पिण्यासाठी पाणी मिळावे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अशी मागणी करून या मुद्द्यावर त्यांनी जनआंदोलनसुद्धा केले होते.
पिंगळाई बंधाऱ्यामुळे पुराचा धोका टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:01 IST
पिंगळाई नदीपात्राचे यापूर्वीच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करून खोलीकरण झाले. त्यानंतर शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये, तसेच भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पूर्वीचा बंधारा काढून टाकण्यात यावा आणि त्याऐवजी ३.५० कोटी खर्चाचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी सातत्याने केली होती.
पिंगळाई बंधाऱ्यामुळे पुराचा धोका टळणार
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : ३.५० कोटींचे बंधाºयाचे काम प्रगतीत जलपातळीतही वाढ अपेक्षित