शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

'झेडपी'त आठ कोटींच्या कामांचे केले तुकडे

By admin | Updated: April 9, 2016 00:05 IST

शासकीय विभागामार्फत कुठलीही विकासकामे करताना तीन लाखांवरील रकमेची कामे ई-टेंडरिंगव्दारेच करावी,

ई-निविदा टाळण्यासाठी शक्कल : प्रशासनाने लावली शासन निर्णयाची वाटअमरावती : शासकीय विभागामार्फत कुठलीही विकासकामे करताना तीन लाखांवरील रकमेची कामे ई-टेंडरिंगव्दारेच करावी, असा शासन निर्णय आहे. मात्र जिल्हा परिषदेत या आदेशाला हरताळ फासत सुमारे आठ कोटी रूपयांच्या एकत्रित कामांचे चक्क ई-टेंडरिंग प्रक्रिया टाळण्यासाठी तुकडे पाडून दुरूस्ती व बांधकामे मार्गी लावल्याची बाब पुढे आली आहे.जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत व दुरूस्तीची 'आठ पीएच' या लेखाशिर्षाखाली सुमारे ३.५० कोटींची कामे मंजूर करण्यात आली. आदिवासी उपयोजनेतील ३०-५४ या लेखाशिर्षातून ४.५० लाखांची दुरूस्ती व बांधकामे मंजूर करण्यात आली. या कामांना काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत हिरवी झेंडी दिली आहे. सदरची कामे तीन लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीची असल्याने या कामासाठी ई-टेंडरिंग करणे आवश्यक होते. मात्र ही प्रक्रिया टाळण्यासाठी एकत्रित असलेल्या सुमारे दोन्ही योजनेतील सुमारे आठ कोटी रूपयांची आठ आरोग्य व आदिवासी उपयोजना ३०-५४ या लेखाशिर्षाखालील कामांचे प्रत्येकी तीन लाखांप्रमाणे तुकडे पाडून काही कामांच्या वर्क आॅर्डरसुध्दा संबंधितांना देण्यात आल्यात. उर्वरित कामाच्या वर्क आॅर्डर देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासन स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कामाचे तुकडे पाडण्यात येऊ नये आणि यासाठी निविदा काढून कामे करण्याचे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे स्पष्ट आदेश असताना झेडपीत संगमताने या कामांची स्वत: व मर्जीतील लोकांना कामे देऊन मलिदा लाटण्यासाठी शासन आदेशाला हरताळ फासत ही कामे मार्गी लावली आहेत. ज्या कामांचे तुकडे पाडण्यात आले अशी कामे प्रशासनाच्या निदर्शनास येताच या कामांना तांत्रिक मान्यता देऊ नये, यासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु शासनाचा आदेश व परवानगी बाजूला ठेवत मर्जीतून सुमारे ८ कोटींची कामे सोईस्करपणे करण्याचा प्रयोग काही महाशयांनी केला. याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केली जात आहे. साधारपणे ५० लाखांच्या रकमेत नवीन आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात येते. मात्र मेळघाटातील आठ आरोग्य व आदिवासी उपयोजना ३०-५४ मधील निधीत चक्क दुरूस्तीचीच अधिक कामे असल्याचीही माहिती आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचे रस्ते विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. दुसरीकडे लाखो रूपयांची कामे स्वत:च्या फायद्याकरिता तुकडे पाडून सोईस्कर विल्हेवाट लावण्याचा नवा प्रयोग केला आहे. (प्रतिनिधी)