शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सहायक प्राध्यापकांसाठी पीएच.डी. अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:43 IST

विद्यापीठात सहायक प्राध्यापकपदासाठी आता पीएच.डी. पदवी बंधनकारक केली असून, या पदवीशिवाय उमेदवारांना अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा पीएच.डी. संशोधकांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आहे.

ठळक मुद्देसंशोधकांची संख्या वाढणार : अन्यथा उमेदवार अपात्र ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठात सहायक प्राध्यापकपदासाठी आता पीएच.डी. पदवी बंधनकारक केली असून, या पदवीशिवाय उमेदवारांना अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा पीएच.डी. संशोधकांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आहे.विद्यापीठाने सहायक प्राध्यापकपदासाठी पात्रता व निकष तयार करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्या समितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची नेमणूक करण्यात आली होती. समितीच्या शिफारशीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने सहायक प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठीचे सुधारित नियम जारी केले आहे. विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापक पदांच्या विविध पात्रता निर्धारित करण्यात आल्या आहेत. त्यात विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये सहायक प्राध्यापकपदासाठी आता पीएच.डी. पदवी अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी सेट किंवा नेट पात्रताधारकांना पीएच.डी.तून सूट होती, तर पीएच.डी. पदवीधारकांना सेट व नेट मध्ये सूट होती. परंतु, आता दोन्ही पात्रता बंधनकारक केल्या आहेत. याशिवाय विद्यापीठांमधील पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या पदांच्या पात्रता व निकषांमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्राध्यापकांचे एपीआय स्कोअर अधिक कठोर करण्यात आले आहेत. यापूर्वी २१ दिवसांचा ओरिएन्टेशन कोर्स करणे बंधनकारक होते. त्यामुळे प्राध्यापक सलग महिनाभर अनुपस्थित राहत होते. त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसत होता. त्यामुळे आता ओरिएन्टेशन कोर्स सात दिवसांचा केला आहे. त्यातही प्राध्यापकांना कोणत्या विषयाचा कोर्स करायचा आहे, ते आधी निवडावे लागणार आहे. त्यात अभ्यासक्रम, परीक्षा विषयक कामे, पेपर सेटिंग यासारख्या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने समितीच्या शिफारशी मान्य केल्या असल्या तरी राज्य सरकारने त्यावर अद्याप अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे नव्या निकष व पात्रतांवर नियुक्ती झाल्यानंतरही राज्य सरकारकडून अध्यादेश निघेपर्यंत त्यांना वेतन मिळणार नाही. सरकारने नव्या निकषांना मंजुरी देऊन त्या लागू करणे आवश्यक आहे.सहायक प्राध्यापकांचे इंडक्शन होणारविद्यापीठ निवड समितीने निवडलेल्या प्राध्यापकाला थेट सेवेत घेण्यात येत होते. परंतु, यापुढे तसे होणार नाही. निवड समितीने नियुक्त केल्यानंतर प्रत्यक्ष कामावर रूजू होण्याआधी किमान एक महिन्याचे इंडक्शन कोर्स करावा लागणार आहे. त्यामुळे नवनियुक्त सहायक प्राध्यापकांना अध्यापन कौशल्य, विषयाचे ज्ञान व इतर बाबींचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहेत.सहायक प्राध्यापक पदासाठी नवे निकष लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता पीएच.डी पदवी असल्याशिवाय या पदासाठी अर्ज देखील करता येणार नाही. येत्या काळात संशोधकांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल.- डॉ. मुरलीधर चांदेकर,कुलगुरु, अमरावती विद्यापीठ.