अमरावती : शहराला पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या डेपोत पेट्रोलचा साठा नसल्याच्या माहितीनंतर गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पेट्रोलपंपांवर वाहनांची रीघ लागली होती. परिणामी पेट्रोलचा साठा संपला असून गुरूवारी अनेक पेट्रोल पंप बंद आढळून आलेत. त्यामुळे कित्येक गरजू वाहनधारकांना वेळेवर पेट्रोेल मिळू शकले नाही. पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या अन्य देशांमधील घडामोडींचा परिणाम यावर जाणवू लागला आहे. ट्रॅक न आल्यामुळे त्याचा परिणामही पेट्रोलच्या पुरवठ्यावर होत आहे. भारताला केला जाणारा पेट्रोल पुरवठा खंडित झाल्याने ही स्थिती उत्पन्न झाली आहे.पेट्रोल महागण्याची शंकापरिणामी डेपोत पेट्रोल नसल्याने शहरात पेट्रोलचा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत अनेकांनी पेट्रोलची अतिरिक्त खरेदी करून ठेवली आणि टँकर न येऊ शकल्याने नव्याने साठा करता येणे शक्य झाले नाही. परिणामी गुरुवारी पेट्रोलपंपांवर शुकशुकाट दिसून आला. अनेकांना विना पेट्रोलने नाहक त्रास सहन करीत वाहने लोटत न्यावी लागलीत. असे चित्र शहरात अनेक मागावर दिसून आल्याने लोकांना पेट्रोल महागणार तर नाही ना!, अशी शंका यायला लागली होती. मात्र तसे काही होणार नाही. सेवा सुरळीत होण्यात विलंब लागणार नाही, असे अमरावती पेट्रोलपंपाच्या संचालकांनी 'लोकमत'शी बलताना सांगितले.
पेट्रोलचा तुटवडा; पंपांवर रांगाच रांगा
By admin | Updated: July 17, 2014 23:49 IST