शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

परप्रांतीय ‘टर्की’ विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:54 IST

दिसायला लांडोरसारखा ‘टर्की’ नावाचा पक्षी हजारोंच्या संख्येत थर्टीफर्स्टच्या मुहूर्तावर बडनेऱ्यात मोठ्या संख्येत विक्रीसाठी आणले आहेत. केरळमध्ये याची मोठ्या प्रमाणात पैदास होते. मात्र, हा पक्षी रोगीट असल्यास तेवढाच घातक ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

ठळक मुद्देथर्टी फर्स्टचा मुहूर्त : रोगीट असल्यास घातक

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : दिसायला लांडोरसारखा ‘टर्की’ नावाचा पक्षी हजारोंच्या संख्येत थर्टीफर्स्टच्या मुहूर्तावर बडनेऱ्यात मोठ्या संख्येत विक्रीसाठी आणले आहेत. केरळमध्ये याची मोठ्या प्रमाणात पैदास होते. मात्र, हा पक्षी रोगीट असल्यास तेवढाच घातक ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.जुन्यावस्तीतील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील खुल्या जागेत हजारो ‘टर्की’ विक्रीसाठी आले आहे. त्याठिकाणी खरेदी करणारे आणि बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. हे पक्षी ट्रकने हैद्राबाद येथून आणण्यात आले. ज्यांनी हे पक्षी आणले ते या पक्षाला चिनी कोंबड्या या नावाने संबोधित आहे. नर व मादी अशा दोन्ही प्रकारात हे पक्षी विकले जात आहे. बडनेरा शहरात ते पहिल्यांदाच विक्रीसाठी आल्याने नाविण्यपूर्ण कोंबड्या पाहून बघ्याची एकच गर्दी उसळत आहे. महामार्गालगतच हे पक्षी ठेवण्यात आल्याने बघणाऱ्यांच्या गाड्या महामार्गावरच उभ्या राहत आहे. त्यामुळे वाहतुकीला देखील खोळंबा होत आहे. हा पक्षी मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या पक्षाची वैद्यकीय तपासणी करूनच त्याला वापरता येते अन्यथा ते घातक ठरू शकते, असे यातील पक्षी जाणकारांचे म्हणणे आहे.बडनेºयात विक्रीसाठी आलेल्या या पक्षी विक्रेत्यांकडे विक्रीचा परवाना आहे किंवा नाही? हे देखील पशूसंवर्धन विभागाने जाणून घेतले महत्वाचे आहे. ‘टर्की’ पक्षाचे मांस हे खाण्यास योग्य की अयोग्य, हे आरोग्यदृष्ट्या तपासणी होणे नितांत गरजेचे आहे. या पक्षामुळे शहराला रोगराई ग्रासणार तर नाही, याची खबरदारी महापालिका पशू वैद्यकीय विभागाने घेणे महत्वाचे आहे.निरोगीपणाची खात्री कोण देणार?हैद्राबाद येथून ट्रकद्वारे हजारो ‘टर्की’ विक्रीसाठी आणले. थर्टी फस्टच्या निमित्त्याने परप्रातीयांनी बाजार थाटला. मात्र, या पक्षाच्या निरोगीपणाची कुठलीही खातरजमा झाली नाही. पशू वैद्यकीय विभागाने याची दखल देखील घेतली नाही. तसेच या विभागाचे प्रमाणपत्र या विक्रे त्यांकडे नाही. त्यामुळे हे ‘टर्की’ जर आजारी किंवा संसर्गजन्य रोगाची लागण झालेली असल्यास खवैय्यासाठी ते घातक ठरणारे आहे. या विक्रेत्यांचे चौकशी करून ओळख, निवासी पत्ता आदी बाबी तपासून घेणे गरजेचे झाले आहे.ेहा टर्की नावाचा पक्षी आहे. केरळमध्ये याची सर्वाधिक पैदास आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करूनच मांस खाण्यास वापरता येईल. अन्यथा ते घातक ठरेल.- डॉ. विजय रहाटे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.